कोल्हापूर - येथील यड्रावच्या शिरेगाव मळा येथे एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जावयानेच हल्ला करत सासरचे संपूर्ण कुटुंब संपवले आहे. यात मारेकऱ्याने त्याच्या पत्नीसह, सासू, मेहुणा आणि मेहुणीचीही हत्या केली. कौटुंबीक वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे समोर येत आहे.
सांगलीच्या प्रदीप जगताप याचे धुमाळ कुटुंबातील रुपाली हिच्याबरोबर लग्न झालेले होते. पण लग्नानंतर त्यांच्या वाद होऊ लागले आणि हे वाद एवढे विकोपाला गेले की, प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले. याच वादातून अनेकदा जगताप आणि धुमाळ कुटुंबीयांमध्ये वाद होत होते. या वादामधून आरोपी प्रदीप जगताप याने पत्नी रुपाली, सासू छाया, मेहुणा रोहित आणि मेहुणी सोनाली यांना संपवले.
लाकडी माऱ्याने संपवले..
आरोपी प्रदीप जगताप हा शनिवारी पहाटेच धुमाळ कुटुंबीयांच्या घरी पोहोचला. त्याठिकाणी आल्यानंतर त्याने यंत्रमागाच्या लाकडी दांड्याने (माऱ्याने) धुमाळ कुटुंबीयांवर एकापाठोपाठ एक फटके मारायला सुरूवात केली. यात चौघेही गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कौटुंबीक वाद असले तरी हत्येचे नेमके कारण काय याचा शोध पोलिस घेत आहेत. आरोपी फरार असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके नियुक्त केली आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment