0
 • Modi is the most trusted friend, we will open the Hind - shinjo aybeटोकियो - पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर दाखल झाले. रविवारी मोदींनी यामनाशी प्रांतातील माउंट फुजीमध्ये जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्याशी त्यांच्या महालात चर्चा केली. मोदी व अॅबे यांच्यात चार वर्षातील ही १२ वी भेट आहे. यावेळी मोदी १३ व्या भारत-जपान वार्षिक संमेलनात सहभागी होण्यासाठी जपान दौऱ्यावर गेले आहेत.

  परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते राजीव कुमार म्हणाले, पंतप्रधान मोदी पाचव्यांदा शिंजो अॅबे यांच्यासमवेत रोबोट व ऑटोमेशन कंपनी फॅनयूसीचा देखील दौरा करणार आहेत. तत्पूर्वी शनिवारी उशिरा रात्री टोकियो विमानतळावर मोदींचे स्वागत झाले. त्यानंतर हॉटेलमध्ये त्यांनी भारतीयांची भेट घेतली. मोदी माझे सर्वात विश्वासू मित्र आहेत, असे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी म्हटले आहे. वृत्तपत्रातील एका मुलाखतीत अॅबे म्हणाले, भारत एक जागतिक शक्ती म्हणून उदयास येत आहे. हिंद-प्रशांत प्रदेश खुला केला जाईल. त्यासाठी भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध बळकट होणे महत्त्वाचे आहे, असे मत अॅबे यांनी व्यक्त केले.
  मोदी-अॅबेंचा बुलेट ट्रेनने ११० किमी प्रवास
  शिंजो अॅबे यांनी पंतप्रधान मोदींना यामानशी येथील आपल्या खासगी निवासस्थानी घेऊन गेले होते. येथे मोदींनी ८ तास मुक्कामी होते. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी काइजी बुलेट ट्रेनमध्ये बसून यामानशी ते टोकियोपर्यंत प्रवास केला. दोन्ही शहरांतील अंतर ११० किमींचे आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पावर चर्चा झाली. यामानशी परिसर माउंट फुजी प्रदेशात वसलेला आहे. माउंट फुजी जपानमधील सर्वात उंच पर्वत आहे. त्याची उंची ३ हजार ७७६ मीट आहे.
  भारत-प्रशांत क्षेत्रात सहकार्य वाढीवर भर
  मोदी व अॅबे यांच्यातील चर्चेत भारत-प्रशांत क्षेत्रात परस्परांतील सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. त्याशिवाय संयुक्त पायाभूत प्रकल्पासह संरक्षण संबंधाला प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवरहित वाहन, रोबोटिक्स प्रणालीवरही चर्चा झाली. संयुक्त प्रकल्पांतर्गत सदस्य देशांशी संवाद वाढवला जाईल.
  > मोदींच्या जपान दौऱ्याचा अन्वयार्थ: जपान भारताच्या मदतीने हिंदी महासागर क्षेत्रातील चीनच्या वाढत्या प्रभावाला कमी करण्याच्या प्रयत्नात
  मैत्री: चीनचा मुकाबला करण्यासाठी एकजूट
  शिंजो अॅबे दोन दिवसांपूर्वी चीनच्या दौऱ्याहून परतले. त्यामुळे मोदींच्या दौऱ्याला खूप महत्त्व आले. डोकलाममुळे भारताची चिंता वाढली होती. चीन,जपान व भारत आशियातील मोठी शक्ती आहेत. चीन अमेरिकेला टक्कर देण्याच्या प्रयत्नात आहे.चीनचा मुकाबला करण्यासाठी भारत-जपान एकजूट करण्याच्या प्रयत्नात आहे.
  - सहकार्य:मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पावर काम
  भारत जपानच्या मदतीने विशेष जागतिक भागीदारी करत आहे. मेक इन इंडिया मध्ये जपान भारताचा महत्त्वाचा भागीदार आहे. जपान १५ अब्ज प्रकल्पाच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पावर काम करत आहे. दोन्ही देशांत बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका यांच्यात गुंतवणुकसाठी चर्चा सुरू आहे. त्यास आर्थिक भागीदारीतून पाहायला हवे.
  टू-प्लस-टू: चीन, उत्तर कोरियाला उत्तर देणार
  भारतासोबत संबंध अधिक बळकट करून जपानने चीन व उत्तर कोरियाला उत्तर देण्याचाही प्रयत्न केला आहे. मोदी व अॅबे यांच्यातील मैत्री त्यादृष्टीने महत्त्वाची ठरते. वास्तविक जपान भारताचा पूर्वीपासून मित्र राहिला आहे. मात्र काही वर्षांपासून आशियात चीनचा प्रभाव वाढत चालल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अस्वस्थता दिसून येते.

Post a Comment

 
Top