0
मुंबई - मुंबईतील ओशीवारा परिसरात फॅशन डिझायनर सुनीता सिंह यांचा मृतदेह शुक्रवारी त्यांच्या अपार्टमेंटमध्ये आढळला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या मुलावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

असे आहे प्रकरण...

45 वर्षीय सुनीता यांचा मृतदेह शुक्रवारी त्यांच्या लोखंडवाला येथील फ्लॅटच्या बाथरूममध्ये आढळला होता. त्यांच्या डोक्याला दुखापत झालेली होती. त्यांना कूपर रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. पोलिसांना याप्रकरणी सुनीताचा मुलगा 23 वर्षीय लक्ष्यवर संशय होता. तो मॉडेलिंग करतो. यानंतर त्याच्यावर सदोष मनुष्यवधाप्रकरणी अटकही करण्यात आली.

दोघांनीही ड्रग्ज घेतली होती?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुनीता आणि लक्ष्य त्याच्या गर्लफ्रेंडसह फ्लॅटमध्येे राहतात. रात्री सुनीता व त्यांचा मुलगा लक्ष्य यांनी ड्रग्ज घेतली. पहाटेच्या वेळी दोघांमध्ये काही कारणाने मोठा वाद झाला. यानंतर चिडलेल्या लक्ष्यने आपल्या आईला जोरात धक्का दिला. यामुळे त्या बाथरूममध्ये पडल्या. यानंतर लक्ष्य घरातून निघून गेला. सकाळी लक्ष्यने पाहिले की, सुनीता अजूनही बाथरूममध्ये पडलेल्या आहेत, तेव्हा त्याने लगेच अॅम्ब्युलेन्स बोलावली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे सुनीता यांना मृत घोषित करण्यात आले.Model Son Killed His Fashion Designer Mother In Mumbai Arrested

सुनीता यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारे त्यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे.

Post a comment

 
Top