0
 • India and the West Indies cricket match virat kohaliनवी दिल्ली - अाशिया कपमधून बाहेर राहून दीर्घ विश्रांती घेतल्यानंतर अाता टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहली मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी मैदानावर उतरणार अाहे. भारत अाणि विंडीज यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेईल. या सलामीचा सामना रविवारी गुवाहाटीच्या मैदानावर हाेणार अाहे. काेहलीला अाता अनेक विक्रमांना यशस्वीपणे गवसणी घालण्याची माेठी संधी अाहे. सलग दाेन मालिका विजयापासून सहाव्या सत्रात हजार धावा पूर्ण करण्यापर्यंतच्या कामगिरीचा त्याला पल्ला गाठता येणार अाहे. यामुळे त्याला करिअरमध्ये सहाव्यांदा एका कॅलेंडर वर्षांतील वनडेत हजार धावा पूर्ण करता येणार अाहे. याची त्याला अाता वनडे मालिकेत संधी अाहे. यापासून ताे २५१ धावांनी पिछाडीवर अाहे. त्याने सत्रात ९ वनडेत ७४९ धावा काढल्या अाहेत. त्यामुळे ताे अाता हा पल्लाही यशस्वीपणे गाठू शकणार अाहे.

  यंदा पाचव्या स्थानी काेहली; शिखर चाैथ्या स्थानी 
  यंदाच्या सत्रातील वनडेत सर्वाधिक धावा काढणाऱ्याच्या यादीमध्ये भारताचा काेहली पाचव्या स्थानावर अाहे. या यादीत इंग्लंडचा बैयरस्ट्राे १०२५ धावांसह अव्वल स्थानावर अाहे. त्याने २२ वनडेत ही धावसंख्या रचली अाहे. रुटने २२ वनडेत ९०४ धावा काढल्या. त्यापाठाेपाठ इंग्लंडचा जेसन राॅय अाहे. त्याच्या नावे २० वनडेत ८४५ धावांची नाेंद अाहे. शिखर धवन चाैथ्या स्थानी अाहे. त्याने १४ वनडेत ६०.३८ च्या सरासरीने ७८५ धावा काढल्या.
  करिअरमध्ये सर्वाधिक वेळा हजार धावा

  फलंदाज वेळा 
  सचिन ०७ 
  गांगुली ०६ 
  पाॅटिंग ०६ 
  संगकारा ०६ 
  काेहली ०५

Post a Comment

 
Top