0
 नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीने एका महिलेला ठार केले आहे. राळेगाव तालुक्यातील चहाद येथे ही घटना घडली आहे. या घटनेत एक जण जखमी झाला आहे. अर्चना कुलसंगे (रा. चहांद) असे मृत महिलेचे नाव आहे तर नामदेव सवई (रा.पोहणा) असे जखमीचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी वनविभागाने सावरखेडा गावात बेस कॅम्प लावला आहे. तिला पकडण्यासाठी अधिकाऱ्यांनी हत्तीला आणले होते. परंतु रात्री ‍नियंत्रणाबाहेर गेला. हत्तीने लोखंडी साखळी तोडून नासधूस करत कॅम्पपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या चहांद गावात पोहोचला. सकाळी शौचास गेलेल्या अर्चना कुलसंगे या महिलेला हत्तीने पायदळी तुडवले. महिलेचा जागीच मृत्यू झाला. नंतर हत्ती पोहणा गावाकडे वळला. तिथे केलेल्या त्याच्या हल्ल्यात एक जण जखमी झाला. त्याला उपचारांसाठी वर्ध्यातील वडनेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हिंगणघाट तालुक्यात वनअ‍धिकार्‍यांनी पकडले..
यवतमाळ जिल्ह्यातील चहांद आणि पोहणा येथे हैदोस घातल्यानंतर हत्ती वर्धा जिल्ह्यात पोहोचला. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील पिपरी शिवारात वनअधिकाऱ्यांनी त्याला पकडले आहे.
Crazed Elephant kills women in Yavatmal Maharashtra

Post a comment

 
Top