0
 • पुणे - सरळ रस्त्याने वेगाने धावण्याची मॅरेथॉन लोकप्रिय आहेच, पण चढउतारांच्या, जंगलवाटांनी वेढलेल्या, खाचखळग्यांच्या दुर्गवाटांवरून धावण्यातही वेगळा थरार असतो, याची जाणीव करून देणारी एसआरटी अल्ट्रा मॅरेथॉन राज्यात प्रथमच आयोजिण्यात येणार आहे. वेस्टर्न घाट्स रनिंग फौंडेशन या विश्वस्त संस्थेने राज्यातील या पहिल्यावहिल्या दुर्ग मॅरेथॉनचे आयोजन डिसेंबर २०१८ मध्ये केले आहे. ही पहिली दुर्ग मॅरेथॉन शिवकाळातील दुर्गराज सिंहगड - राजगड- तोरणा या तीन किल्ल्यांना जोडणाऱ्या वाटांनी पूर्ण करणे अपेक्षित आहे.
  या ट्रस्टचे विश्वस्त दिग्विजय जेधे यांनी गुरुवारी या एसआरटी (सिंहगड-राजगड-तोरणा) मॅरेथॉनची घोषणा केली.


  मॅरेथॉनचा खेळ जगभरात लोकप्रिय आहे. मात्र सोप्या, सपाट, सुरक्षित रस्त्यांवरून वेगाने धावण्यापेक्षा तरुणाईचे लक्ष अवघड, दुर्गम आणि थरारक वाटांनी धावण्याकडे लागले आहे. यातूनच जगभरात माउंंटन ट्रेल रनिंग हा साहसी क्रीडाप्रकार युवा धावपटूंमध्ये लोकप्रिय झाला आहे. त्याचीच प्रेरणा घेत आम्ही राज्यात प्रथमच अशा प्रकारची माउंंटन रनिंग ट्रेल
  स्पर्धात्मक स्वरूपात आयोजित केली आहे, असे दिग्विजय जेधे यांनी सांगितले. या उपक्रमासाठी राज्याचा वन विभाग आणि पुरातत्त्व विभागाने विशेष सहकार्य आणि परवानग्या दिल्या आहेत. या सर्वांच्या माध्यमातून ही मॅरेथाॅन यशस्वी हाेणार असल्याचे दिसते.
  दुर्ग मॅरेथॉनचा मार्ग पर्वतरांगांमधून
  सह्याद्रीची पर्वतरांग हा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेल्या पश्चिम घाटाचा महत्त्वाचा भाग आहे. दुर्ग मॅरेथॉनचा मार्ग सह्याद्रीच्या या पर्वतरांगांमधून, वनाच्छादित प्रदेशातून जाणारा आहे. याच प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले दुर्गराज
  आजही साहसवीरांना खुणावत आहेत. त्यामुळे सिंहगड, राजगड - तोरणा अशा तीन महत्त्वाच्या दुर्गांना जोडणाऱ्या वाटांनी ही पहिली अल्ट्रा मॅरेथॉन धावेल. यानिमित्ताने युवा मनांत दुर्गांविषयी, इतिहासाविषयी, साहसी क्रीडेविषयी उत्सुकता वाढेल, हाही हेतू आहे, असे चमूने सांगितले.
  मॅरेथाॅन माध्यमातून आयटीआरएचे ३ गुण मिळवण्याची धावपटूंना संधी 
  एसआरटी अल्ट्रा मॅरेथॉन ही इंटरनॅशनल ट्रेल रनिंग असोसिएशन (आयटीआरए) ची सदस्य आहे. तसेच अल्ट्रा ट्रेल ही जगातील सर्वांत प्रतिष्ठेच्या व अवघड मानल्या जाणाऱ्या फ्रान्स येथील माउंटन मॅरेथॉनशी संलग्न असल्याने त्या स्पर्धेसाठी स्पर्धकांना या दुर्ग मॅरेथॉनचे
  तीन गुण मिळवता येतील. याचा माेठा फायदा या धावपटूंना हाेणार अाहे. त्यामुळे ही मॅरेथाॅन सर्वांसाठी महत्त्वाची मानली जाते.
  तीन टप्प्यांतील दुर्ग मॅरेथॉन; यावरून धावणार धावपटू
  सिंहगड - पायथा ते तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थळ आणि परत पायथा - ११ किलोमीटर 
  सिंहगड ते राजगड - कल्याण दरवाजामार्गे विंझर, साखरगा
  व ओलांडून राजगड गुंजवणे - २५ किलोमीटर
  सिंहगड - राजगड-तोरणा - सिंहगड पायथा ते राजगड - संजीवनी माचीमार्गे बुधला माची, तोरणा चढून - उतरून वेल्हे गाव - ५० किलोमीटर
  धावपटू्ंसाठी ही दुर्ग मॅरेथॉन रोमांचक ठरेल : तीनही ठिकाणांची उंची सुमारे २४०० मीटर (७८७५ फूट) आहे. खेळाडूंची सहनशक्ती, दमसास, वेग, स्टॅमिना, मनोधैर्य, साहस, प्रसंगावधान, मनोबल पणाला लागणार आहे. स्पर्धकांना या मार्गावर जंगले, दऱ्या, टेकड्या, तीव्र चढ यांचा सामना करायचा आहे. खेळाडूंनी स्वत:साठी अर्धा लिटर पाणी, एखादे फळ, ट्रेकिंग पोल्स बाळगणे आवश्यक आहे. ट्रस्टच्या वतीने ठिकठिकाणी स्वयंसेवक मार्गदर्शनासाठी 
  धावपटू्ंसाठी ठरणार फायदेशीर; पहिल्यांदा अायाेजन
  राज्यात पहिल्यांदाच ही माउंटन अँड ट्रेल मॅरेथॉन अायाेजित करण्यात अाली अाहे. या मॅरेथाॅनचा प्रतिभावंत युवा धावपटूंसाठी फायदा हाेईल. त्यासाठीच अाम्ही याचे अायाेजन केले. अशा प्रकारचा मॅरेथाॅनच्या माध्यमातनुन धावपटंूंना या अल्ट्रा मॅरेथाॅनचीही याेग्य प्रकारे तयारी करण्याची संधी अाहे. त्यामुळे या मॅरेथाॅनलाही महत्वाचे मानले जात असल्याचे म्हटले जाते
  In December, the first Mountain and Trail Marathon in the state of Pune
 • व आवश्यक तेथे साह्य करण्यासाठी उपलब्ध असतील.

Post a Comment

 
Top