0
अगरतळा - भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आझाद हिंद सेनेचे नेताजी सुभाषचंद्र यांच्या रहस्यावर खळबळजनक दावा केला आहे. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सांगितले, की बोस यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येसाठी रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष जोसेफ स्टॅलिन प्रामुख्याने जबाबदार होते. ते शनिवारी येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. "बोस यांचा मृत्यू 1945 मध्ये झालाच नाही. ही गोष्ट चुकीची आहे. हा (देशाचे पहिले पंतप्रधान) जवाहर लाल नेहरू आणि जपानींचा कट होता. नेहरूंना या सर्व गोष्टींची माहिती होती." स्वामी इत्याकच थांबले नाहीत. नेताजींच्या आझाद हिंद सेनेमुळेच ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य दिले. 75 वर्षांपूर्वी सिंगापूरमध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना झाली होती असा दावा सुद्धा स्वामींनी केला आहे.
राष्ट्रपती हटवू शकतात कलम 370
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर धक्कादायक दावा करताना त्यांनी काश्मीरात लागू असलेल्या कलम 370 वर सुद्धा आपले मत व्यक्त केले. राज्यघटनेतील कलम 370 भारताचे राष्ट्रपती एक अध्यादेश काढून हटवू शकतात. या कलमात विशेष दर्जा मिळालेला असतो. एवढेच नव्हे, , तर अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीसाठी पुढचे मार्ग आणखी मोकळे झाले आहेत असा दावा सुद्धा स्वामींनी केला.

हा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू आणि जपानींचा कट होता. नेहरूंना या सर्व गोष्टींची माहिती होती. -स्वामी

  • subramanian swamy claims subhash chandra bose was assasinated by russsia, blames nehru too

Post a comment

 
Top