0
 • Nagpur Vijayadashmi utsav, Rss Chief Mohan bhagwat speechनागपूर - अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी वर्षभरातच भूमिका बदलली आहे. नागपुरात विजयादशमी उत्स्वात ते म्हणाले, कोर्टात हे प्रकरण लांबवत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, समाजाच्या धीराची ही प्रतीक्षा कुणाच्याही हिताची नाही. यामुळे सरकारने मंदिर निर्मितीसाठी कायदा आणला पाहिजे. मात्र, १३ सप्टेंबर २०१७ मध्ये ते दिल्लीत म्हणाले होते की, अयोध्या प्रकरणावर संघ सुप्रीम कोर्टाचा निकाल मान्य करेल. गुरुवारी ते म्हणाले, अयोध्येत एकेकाळी राम मंदिर असल्याचे पुरावेही आहेत. मात्र, या देशहिताच्या मुद्द्यावर काही कट्टरपंथी व जातीयवादी राजकीय शक्ती अडचणी आणत आहेत.


  गेल्या ५ विजयादशमी उत्सवातील भाषणांत राम मंदिराचा उल्लेख नाही
  - आत्मसन्मानाची बाब 
  केंद्र सरकारने कायदा करून भव्य राम मंदिराचा मार्ग प्रशस्त करावा. जन्मभूमीवर मंदिराच्या प्रयत्नांत कोट्यवधी लोकांच्या भावनांसोबत संघही आहे. आत्मसन्मानाच्या दृष्टीनेही मंदिर गरजेचे आहे.
  - गतवर्षी म्हणाले होते 
  भागवतांना विचारले गेले होते की, सव्वा वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मंदिराचा तिढा सुटेल का? ते उत्तरले होत की. राम मंदिरावर कोर्टाचा जो काही निकाल येईल तो संघाला मान्य असेल.
  ...अन् आता महिनाभरात तिसऱ्यांदा मंदिराचा उल्लेख 
  १९ सप्टेंबर : दिल्लीत म्हणाले, मंदिरासाठी अध्यादेश जारी केला जाऊ शकतो की नाही हे मला माहीत नाही, मात्र बांधकाम लवकर सुरू व्हावे.
  मुखर्जींनंतर संघ व्यासपीठावर नोबेल विजेते सत्यार्थी
  व्यासपीठावर शांततेचे नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी उपस्थित होते. याआधी एका कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जीही आले होते.

  १ ऑक्टोबर : हरिद्वारमध्ये म्हणाले, विरोधी पक्ष मंदिराला थेट विरोध करू शकत नाहीत. संघ आणि भाजप राम मंदिर उभारण्यासाठी कटिबद्ध आहे

Post a Comment

 
Top