मालेगाव- अनुसूचित जाती अारक्षण व संविधानात बदल हाेणार नाही असे अाश्वासन पंतप्रधान नरेंद्र माेदींनी दिले अाहे. त्यामुळे रिपाइं अागामी निवडणुकीत भाजपसाेबतच राहणार अाहे. लाेकसभेसाठी भाजप व शिवसेनेची युती झाली तर रिपाइं दक्षिण मुंबई तसेच सातारा जागेची मागणी करणार अाहे. राष्ट्रवादी काँग्रेसने खासदार उदयनराजे भाेसले यांना उमेदवारी नाकारल्यास त्यांनी रिपाइंत यावे असे निमंत्रण देणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास अाठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंगळवारी अाठवले नाशिक जिल्हा दाैऱ्यावर हाेते. मालेगावी सायंकाळी जाहीर सभेपूर्वी राज्यमंत्री अाठवले यांनी विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. २०१९ च्या निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. साडेचार वर्षांच्या काळात सरकारने जनतेला सामाजिक व अार्थिक न्याय देण्याचा प्रयत्न केला अाहे. मुंबईत ७६३ काेटी रुपये खर्च करून डाॅ. बाबासाहेब अांबेडकरांचे स्मारक उभारले जात अाहे. तळागाळातील जनतेला विकासाच्या प्रवाहात अाणून सरकारने 'सबका साथ, सबका विकास' करून दाखविला अाहे. काँग्रेसला संपविण्याचे काम पंतप्रधान माेदी यांनी केले अाहे. त्यामुळे काँग्रेस जाणूनबुजून माेदींवर अाराेप करत अाहे. रफाल विमान खरेदी प्रकरणात कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही. पंतप्रधान माेदी हे स्वच्छ चारित्र्याचे व्यक्तिमत्त्व असल्याचे राज्यमंत्री अाठवले यांनी सांगितले. सामाजिक न्याय मंत्रालयाने अनेक याेजनांची प्रभावी अंमलबजावणी केली अाहे. जनतेचा विश्वास संपादित करण्यात सरकार यशस्वी ठरले अाहे. अागामी निवडणुकांमध्ये शिवसेना व भाजपने एकत्र लढावे अशी अाशा असून यासाठी अापण प्रयत्न करू, असेही स्पष्ट केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रकाश लाेंढे, महानगरप्रमुख भारत चव्हाण, दीपक निकम, तालुकाध्यक्ष दिलीप अाहिरे, दिनकर धिवर, कैलास अाहिरे उपस्थित हाेते.
वंचित अाघाडीचा भाजपलाच फायदा
भारिप व एमअायएमच्या वंचित बहूजन अाघाडीचा भाजपला फायदा तर काँग्रेसचे नुकसान हाेणार असल्याने या अाघाडीचे स्वागत करताे. कुणी कुणासाेबत युती करावी हा त्या पक्षाचा प्रश्न अाहे. तरीही वंचित अाघाडीचा फारसा प्रभाव राज्याच्या राजकारणात पडणार नसल्याचे राज्यमंत्री अाठवले यांनी सांगितले.
नाेकऱ्यांमधील बढतीसाठी अारक्षणाची मागणी
पाेलिस उपनिरीक्षकपदी बढती मिळालेल्या १५४ जणांना मूळ पदावर नियुक्ती देण्याचा प्रकार घडला अाहे. हा अादेश सुप्रीम काेर्टाच्या निर्णयामुळे झाला असला तरी यासंदर्भातील पुढील निर्णय राज्य सरकारने घ्यावा असे निर्देश देण्यात अाले अाहे. नाेकरीतील बढतीमध्ये अारक्षण देण्याचा विचार करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही राज्यमंत्री अाठवले यांनी स्पष्ट केले.
मालेगावी जाहीर सभेत म्हणाले...
रिपाइं सर्व जातीधर्मांना बराेबर घेऊन चालणारा पक्ष अाहे. मराठा व अनुसूचित जातींनी परस्परांशी वाद घालत एकत्र राहण्याची गरज अाहे. मराठा अारक्षणाला अापल्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा अाहे. मात्र इतर जातींच्या अारक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला १६ टक्के अारक्षण देण्याची अामची मागणी अाहे. मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बाेलू. पंतप्रधान नरेंद्र माेदींनी या देशाचं कल्याण करण्याचा प्रयत्न केला अाहे. नाेटबंदीचा निर्णय सामान्यांना न्याय देणारा व काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हाेता.
सध्या पेट्राेल व डिझेल दरवाढीचा सामान्य जनतेला त्रास हाेत अाहे. त्यामुळे इंधनाचे दर कमी करण्याची मागणी अाम्ही करीत अाहाेत. इंधन जीएसटीमध्ये टाकले तर प्रति लिटर २० ते ३० रुपये कमी हाेतील. दरवाढीचा सर्वसामान्यांना त्रास हाेता कामा नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सन २०१९ ची मॅच भाजपला िजंकायची असेल तर इंधनाचे दर कमी करावे लागतील, म्हणजे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा भाव कमी हाेईल. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रकाश लाेंढे, मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक बंडूकाका बच्छाव, अध्यक्ष राजेंद्र जाधव, उपाध्यक्ष सुनील देवरे, राकेश देवरे, दिलीप अहिरे, भारत चव्हाण, मिलिंद गरुड व पदाधिकारी उपस्थित हाेते.
Post a Comment