- प्रत्येक व्यक्ती विविध नात्यांनी बांधलेले असतो, यामधील काही नाते जन्मापासूनच आपल्यासोबत जोडलेले असतात आणि काही आपण स्वतः बनवतो. आई-वडील, बहीण-भाऊ, आजी-आजोबा हे सर्व नाते आपल्याला जन्मताच मिळतात परंतु असे एक खास नाते असते जे आपण स्वतः निवडतो, ते म्हणजे आपला जोडीदार. लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि सुखाचा क्षण असतो, कारण या दिवशी आपल्यासोबत एक नवीन नाते तयार झाले होते आणि आपण यासोबत आयुष्याचा मार्ग पूर्ण करतो.
लग्नाचे हे बंधन वर आणि वधू दोघांसाठीही नवीन आयुष्याची सुरुवात असते. दोघेही आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी नवीन स्वप्न साकार करण्यासाठी एकमेकांचा हात हातामध्ये घेतात. दोघांच्याही कुटुंबामध्ये उत्साह, आनंदाचे वातावरण असते परंतु या काळात वर आणि वधू दोघेही येणाऱ्या भविष्याचे स्वप्न रंगवत असतात. दोघेही लग्नाच्या दिवसाची वाट पाहात असतात कारण त्यांना माहिती असते की, थोड्याच दिवसांमध्ये ते नवीन आयुष्यत झेप घेणार आहेत. संगीत, हळद,मेंदीपासून ते लग्नाच्या दिवसापर्यंत प्रत्येक दिवशी एक नवीन आनंद आणि उत्साह. मनामध्ये अनेक स्वप्न आणि आशा घेऊन वधू लग्नाच्या मंडपात पोहोचते तर आयुष्यभर साथ आणि आनंद देण्याचे वाचन देऊन वर घोड्यावर चढतो. लग्नाच्या मंडपात दोघेही एकमेकांच्या समोर आल्यानंतर स्मितहास्य करून वचन घेतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment