0
कराड दि - २२
           कराड पासून जवळ असणाऱ्या पाचवड फाटा येथे मुधाई दूध डेयरी मध्ये स्फोटात एक कामगार ठार...
या डेयरीमध्ये काम करणारा कामगार हा परप्रांतीय असुन तो या कंपनी मध्ये गेली १० वर्ष ऑपरेटर म्हणुन काम करत होता व तो गेली १० वर्ष झाले जी मशीन ऑपरेट करत होता त्याच मशीन चा आज दुपारी १ च्या सुमारास  स्फोट झाला व त्या स्फोटामध्ये त्याला आपला जिव गमवावा लागला. उमेशकुमार हिंगुराव यादव (वय २८ मूळ रा. भदोली, रविधारानगर, उत्तरप्रदेश. सध्या रा. कालेटेक, ता. कऱ्हाड ) असे मृत आॅपरेटरचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कालेगावच्या हद्दीत पाचवडफाटा येथे मुधाई दूध डेअरी आहे. या डेअरीत परिसरातील गावातील संकलित केलेले दूध आणले जाते. तसेच दुधाचे वेगवेगळे फ्लेवर तयार करून ते दूध सातारासह इतर जिल्ह्यांत वितरित केले जाते. सोमवारी सकाळीही डेअरीत दूध संकलन करण्यात आले. त्यानंतर महिला कामगारांनी काचेच्या बाटल्यांमध्ये वेगवेगळे फ्लेवर टाकून सुगंधी दूध तयार केले.
दुधाने भरलेल्या या बाटल्या विशिष्ट तापमानास गरम करण्यासाठी स्टरलायझर मशीनमध्ये ठेवण्यात येतात. त्याप्रमाणे मशीन आॅपरेटर उमेश कुमार यादव याने दुधाने भरलेल्या बाटल्यांचे ट्रे मशीनमध्ये ठेवले. दूध गरम होण्यासाठी त्याने मशीनचा दरवाजा बंद केला. मात्र, दरवाजा व्यवस्थित बंद झाला नसावा.
परिणामी काही वेळातच दाब वाढून अचानक मशीनचा दरवाजा मोठ्या दबावाने उघडला गेला. या लोखंडी दरवाजाचा दणका उमेशकुमारला बसल्यामुळे तो जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले. पंचनाम्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून देण्यात आला. 


सातारा : कालेच्या मुधाई डेअरीत दुर्घटना, स्टरलायझर मशीन आॅपरेटर्सचा मृत्यू


Post a Comment

 
Top