काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने हल्ले करत आहेत. ते मोदींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप तर करत आहेतच, शिवाय पंतप्रधान स्वत: भ्रष्टाचार व्यवस्थापन करत आहेत, असे स्पष्टपणे सांगतही आहेत. ते म्हणतात की, सर्वोच्च न्यायालय, सीबीआय, माध्यमांसारख्या संस्थांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. दैनिक भास्करचे संपादक आनंद पांडे यांनी राहुल यांची त्यांच्या निवासस्थानी विशेष मुलाखत घेतली.
भास्कर : मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजप सरकारला १५ वर्षे झाली आहेत. पण भाजप-काँग्रेसमध्ये काट्याची लढत होत असल्याच्या बातम्या येत आहेत. तिथे एवढी अँटी इन्कम्बन्सी आणि सरकारविरोधातील नाराजी का निर्माण होऊ शकली नाही? भाजप एवढे चांगले काम करत आहे का?
राहुल : माध्यमांचा विचार आणि जनतेचा विचार यात खूप फरक आहे. खरे तर सर्व राज्यांत भाजपविरुद्ध खूप राग आहे, अँटी इन्कम्बन्सी आहे. भाजपच्या राज्यात आमचे खूप नुकसान झाले आहे, असे जनता म्हणते. पण माध्यमांना ते दिसत नाही. त्याचे कारण तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलेच माहीत आहे.
भास्कर : तुम्ही वारंवार माध्यमांवर आरोप करता, पण भाजपचे मार्केटिंग काँग्रेसपेक्षा खूप चांगले आहे, असे तुम्ही स्वत: म्हटले होते. अजूनही हेच मत आहे का?
राहुल : जेथे-जेथे त्यांचे सरकार आहे तेथे माध्यमांवर त्यांचा दबाव आहे. ते आम्हाला आणि जनतेला चांगले माहीत आहे. देशात भीतीचे वातावरण आहे. मार्केटिंगबाबत बोलायचे तर एका मोठ्या स्तरावर म.प्र., छत्तीसगड, राजस्थानमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. त्याच पैशांचा उपयोग मार्केटिंगसाठी केला जात आहे. भ्रष्टाचाराचा पैसा असल्यानेच त्यांचे मार्केटिंग चांगले आहे, असे मला म्हणायचे होते.
भास्कर : १०० वर्षांचा इतिहास पाहिल्यास शेतकऱ्यांचे राजकारण प्रत्येक पक्ष करतो, पण बिचारा शेतकरी जिथल्या तिथेच आहे.
राहुल : हे खरे नाही. शेतकऱ्यांची प्रगती झाली, नंतर मोदी सरकारमध्ये शेतीला अवकळा आली. हरितक्रांतीच्या आधी शेतकऱ्यांची स्थिती सध्यापेक्षा खूप वाईट होती. आज शेतातून शेतकऱ्यांना योग्य उत्पन्न मिळत नाही. हरितक्रांती, बँकांचे राष्ट्रीयीकरण, उदारीकरण, सेलफोन-काॅम्प्युटर आणून काँग्रेसने शेतीचा मार्ग बदलला होता, तसाच शेतकऱ्यांसाठी आर्थिक प्रगतीचा नवा रस्ता बनवण्याची गरज आहे. कर्जमाफी शेतकऱ्यांचा हक्क आहे. भाजप मुद्द्यांकडे सर्वंकष पद्धतीने पाहतच नाही. पंतप्रधान १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून म्हणतात की, मी येण्याआधी देशाचा हत्ती झोपलेला होता. हा देश हजारो वर्षांपासून बुद्धी आणि ज्ञानाचा स्रोत आहे. पण त्यांच्या मते संपूर्ण देश विश्वगुरू नव्हता, उलट झोपलेला होता. या देशाचा आत्मा समजून घेण्यासाठी मला अनेक वर्षे लागली. या देशाला नियत समजते. या देशात मार्केटिंग चालत नाही.
भास्कर : त्यामुळेच तर ते ‘मन की बात’ करतात...
राहुल : स्वत:च्या मनातील गोष्ट. पंतप्रधानांनी महाराणा प्रताप असो की झाशीची राणी, सर्वांना अपमानित केले. स्वत:ला भगवान कृष्णापेक्षाही श्रेष्ठ रणनीतिकार म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला. पण हे खरे नाही हे देश जाणतो. पंतप्रधानांच्या कामाची सुरुवात कोठून होते? आधी संपूर्ण देश पंतप्रधानांवर विश्वास ठेवतो. मग पंतप्रधान देशाचा विश्वास जिंकून काम करू शकतो. मी येण्याआधी काही झाले नाही, असे पंतप्रधान म्हणत असतील तर त्याचा अर्थ त्यांनी विश्वास गमावलाय. भाजप नेत्यांच्या मूळ विचारात समस्या आहेत. आपण सर्वज्ञानी आहोत, असे त्यांना वाटते.
भास्कर: मप्रमध्ये बसप, सप व अन्य लहान पक्ष काँग्रेससोबत निवडणूक लढतील,असे मानले जात होते. तसे न होता, उलट मायावतींनी छत्तीसगडमध्ये जोगींशी हातमिळवणी केली.
राहुल: आमच्यात चर्चा झाली तेव्हा मध्य प्रदेशच्या नेत्यांचा एक विचार होता. त्यांच्यानुसार जागा वाटपात सुटणाऱ्या जागांची संख्या मर्यादित होती. मायावतींचा पक्ष त्यापेक्षा जास्त जागा मागत होता. मी आमच्या राज्यातील नेत्यांच्या मतापेक्षा पुढे जात सांगितले की, आपणास जागावाटपात मन मोकळे ठेवले पाहिजे. मात्र, शेवटच्या क्षणी त्यांनी पूर्ण चर्चाच संपवली.
भास्कर: मग शेवटी काँग्रेसला याचे परिणाम भोगावे लागतील?
राहुल: नाही, आमच्यावर एवढा परिणाम होणार नाही. या राज्यांत बसपचा मतांचा वाटा मर्यादित आहे. नुकसान होणार याचा आम्हाला विश्वास आहे. तिन्ही राज्यांतील लोक भाजपचा पराभव करू इच्छितात हाच आघाडीपेक्षाही मुख्य मुद्दा आहे. भाजपला केवळ काँग्रेसच हरवू शकते,हे लोकांना माहीत आहे. बसप व अन्य लहान पक्षांची भूमिका अनुकूल ठरली असती,पण तसे झाले नाही.
भास्कर: तुम्ही जेव्हा दौऱ्यावर जाता तेव्हा प्रत्येक राज्यातील मोठा नेता मंचावर तुमच्यासोबत असतो. मग ते सचिन-गहलोत असोत की कमलनाथ-दिग्विजय- शिंदे असोत. मात्र, ही एकी मंचाच्या खालीही उतरते काय?
राहुल: हे पाहा, प्रत्येक राज्यात अनुभवी व युवा नेते आहेत. या दोघांना जोडण्याचे काम माझे आहे. प्रथमच तुम्ही पाहिले असेल की सर्व जागी सर्व एकत्र येऊन भाजप सरकारांशी लढत आहेत.
भास्कर: छत्तीसगडमध्ये त्रिशंकू सरकार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राहुल: नाही. तिथे त्यांचा सफाया होईल. तुम्ही नोंद करा... मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड तीनही ठिकाणी पूर्ण बहुमत मिळेल. भाजपला एवढा तगडा झटका बसेल की तिथे भाजप दिसणारही नाही. कारण, लोकांत प्रचंड राग आहे. शेतकऱ्यांना भविष्याचा मार्ग दिसत नाही. ना त्यांना हमीभाव मिळतो, ना विम्याचे पैसे, ना कर्ज माफ होते. दुसरीकडे नीरव मोदी व मेहुल चौकसी ३६ हजार कोटी रुपये घेऊन पळून गेल्याचे शेतकरी पाहत आहेत. विजय मल्ल्या ९ हजार कोटी घेऊन पळाला आणि इकडे अनिल अंबानींच्या कंपनीस ३० हजार कोटी रुपये देण्यात आले. याचा अर्थ मध्य प्रदेशचे कर्ज तुम्ही एका माणसाच्या पैशातून माफ करू शकता. असाच दुसरा गट आहे युवांचा. मोदीजी म्हणाले होते, दोन कोटी तरुणांना रोजगार मिळेल. आज वास्तव हे आहे की, संपूर्ण देशात दररोज केवळ साडेचारशे तरुणांना रोजगार मिळत आहे. तुम्ही रमणसिंग यांचे पुत्र असाल, वसंुधरा यांचा मुलगा असाल, शिवराज यांचे पुत्र असाल तर तुम्हाला व्यवसाय मिळेल. फायदाही होईल. त्रिशंकू सरकार येईल हा तुमचा प्रश्न योग्य नाही. तुम्ही पाहाल. गेल्या निवडणुकीत भाजप व काँग्रेसमध्ये एका टक्क्याचे अंतर होते. या वेळी कमीत कमी तीन-चार टक्क्यांचे अंतर राहील
भास्कर: जोगींची गरज भासली तर?
राहुल: जोगी अप्रासंगिक आहेत. ते छत्तीसगडच्या राजकारणासाठी प्रासंगिक नाहीत.
भास्कर: तुम्ही मंदसौरमध्ये मेड इन मंदसौरचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, भाजप विचारते की, मेड इन अमेठीबाबतही सांगावे.
राहुल: अमेठीत आम्ही वास्तवात खूप प्रभावी काम केलेले आहे. तुम्ही कधी जावे वाटल्यास अवश्य जा. मेड इन अमेठी पूर्ण करण्यासाठी यूपी सरकारचीही गरज आहे. मात्र, केंद्र व यूपीचे भाजप सरकार अमेठीत संस्था बंद करून भेदभाव करत आहे.
भास्कर: रफालच्या मुद्द्यावर दुसऱ्या मोठ्या पक्षाचा एकही नेता तुमच्यासोबत उघडपणे येत नाही, यामागचे कारण काय? यात मग ममता बॅनर्जी, मायावती असो की शरद पवार.
राहुल: रफालमध्ये भ्रष्टाचार स्पष्ट आहे व अनेक स्तरांवर आहे. यात जी निविदा निघली, ती मोदींनी वैयक्तिकरीत्या फेटाळली हाेती. संरक्षणमंत्री, संरक्षण सचिव, राष्ट्रीय संरक्षण समिती, कोणाशीच विचारण केली नाही.
भास्कर: (मध्ये थांबवत) व्हेरी व्हेरी सॉरी . या गोष्टी याआधी सांगितल्या आहेत... मात्र, माझा खूप स्पेसिफिक प्रश्न आहे की, अन्य मोठे पक्ष...
राहुल: मी सांगतोय. लोकांनी हा मुद्दा समजून घ्यावा. पंतप्रधानांनी टेंडरमध्ये काय बदल केला? हे काही १०० फुटांच्या रस्त्याचे टेंडर नाही. हा जगातील सर्वात मोठा संरक्षण करार आहे. तीस हजार कोटी रुपये अनिल अंबानींच्या कंपनीत थेट टाकले. पहिली गडबड इथे आहे. दुसरी बाब, चौकशी सुरू झाल्यास ती थेट पंतप्रधानांपर्यंत पाेहोचेल. काँग्रेस जी लढाऊ विमाने ५२६ कोटी रुपयांत खरेदी करू इच्छित होती, ती मोदींनी १६७० कोटी रुपये प्रति विमानाच्या हिशेबाने खरेदी केले. १२६ लढाऊ विमानांची संख्याही कमी करून ३६ केली. असे का?
भास्कर: एक थोडा वैयक्तिक प्रश्न. तुमच्यावर खूप शाब्दिक हल्ला होतो. कधी मनाला वेदनाही होत असतील. तुमची सोशल मीडियावर एक प्रतिमा तयार केली आहे. हे तुम्ही कसे घेता?
राहुल: माझा विचार, तत्त्वज्ञान, मार्ग म्हणजे मी माझे काम करतो. मी पाहिले की, तुमच्यावर व्यक्त झालेला द्वेष, राग प्रेमाने स्वीकारत असाल तर दोन गोष्टी घडतात. एक द्वेष करणारा थकतो व दुसरे ज्ञान मिळते. हे भगवान शिवाकडून शिकू शकतो. समाज सुरक्षित राहण्यासाठी त्यांनी विष कंठात धारण केले. तुम्हाला समाज बदलायचा असेल तर, दुबळ्यांसाठी लढू इच्छित असाल तर शक्तिशाली लोक तुम्हाला मारतील, शिव्या घालतील. यात तुमच्याकडे दोन पर्याय असतील. एक उठून उभे राहा व दुसरे पळून जावा. मी उभा आहे. मी देशातील प्रत्येक गरीब, शेतकरी, महिला व तरुणासाठी लढेन.
महाअाघाडीबाबत...
भास्कर : सर्व राजकारण महाअाघाडी या एकाच शब्दाच्या अवतीभाेवती फिरत अाहे.
राहुल : नाही. राजकारण केवळ दोन मुद्द्यांच्या आजूबाजूला फिरतेय. ते म्हणजे- तरुणांना रोजगार व शेतकऱ्यांचे भवितव्य. शेतकरी म्हणत अाहेत की, अाम्हाला मार्ग दिसत नाहीये व तरुण म्हणताहेत की, अाम्हास रोजगार मिळत नाहीये. लहान-लहान दुकानदारांचे व्यवसायच ठप्प झाले असून, चहुबाजूला हाहाकार माजला अाहे.
भास्कर : याचा अर्थ अाघाडी न करताही तुम्ही सारे जण रालाेअाला बाहेर कराल?
राहुल : अामचे मार्ग व विचार उदार अाहेत. अाम्ही प्रेमाने सर्व लोकांना साेबत घेऊन चालू.
भास्कर : अाघाडीबाबत किती आश्वस्त अाहात?
राहुल : जरूर व अडथळ्यांविना होईल; परंतु मुद्देच महत्त्वाचे अाहेत. रोजगार, शेतकरी, गब्बर सिंग टॅक्स (जीएसटी), भ्रष्टाचार, नोटबंदी आदी. नोटबंदीने इम्फॉर्मल सेक्टर संपवले. हिंदुस्थानच्या पाठीचा कणा अाहे हे क्षेत्र. जे पीएम असे काम करू शकतात, त्यांच्या मनात या देशासाठी काेणतीही भावना नाहीये. मध्यम व लहान उद्याेगांना संपवले. या मुद्द्यांसह जनतेच्या समस्यांवर अाघाडी बनेल.
न्यायसंस्थेबाबत...
भास्कर : तुम्ही न्यायसंस्थेला दाबण्याबद्दल व सर्वाेच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबाबत बाेलत अाहात; परंतु काँग्रेसवर तर नेहमीच न्यायसंस्थेला दाबण्याचे आरोप लागले अाहेत. मग ताे ७३मध्ये ए.एन.रे साहेबांना सरन्यायाधीश बनवण्याचा मुद्दा असाे की इतर अनेक मुद्दे.
भास्कर : तुम्ही न्यायसंस्थेला दाबण्याबद्दल व सर्वाेच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबाबत बाेलत अाहात; परंतु काँग्रेसवर तर नेहमीच न्यायसंस्थेला दाबण्याचे आरोप लागले अाहेत. मग ताे ७३मध्ये ए.एन.रे साहेबांना सरन्यायाधीश बनवण्याचा मुद्दा असाे की इतर अनेक मुद्दे.
राहुल : इतिहासात प्रथमच सर्वाेच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली. यापूर्वी असे झाले काय? न्यायाधीश लोयांच्या हत्या प्रकरणात अमित शहांवर आरोप असून, यावर चर्चा केली जाते. देशात सीबीआयच्या संचालकांना नियुक्त करणे व हटवण्याचा कायदा अाहे; परंतु रात्री १ वाजता पंतप्रधान बेकायदेशीररीत्या आदेश काढून त्यांना हटवतात. हेदेखील हिंदुस्थानच्या इतिहासात पूर्वी झाले नाही.
मुख्यमंत्र्यांबाबत...
भास्कर : तुम्ही तिन्ही राज्यांत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून पुढे न करताच निवडणूक लढवत अाहात. यास पक्षाची अंतर्गत लोकशाही सांगता; परंतु सध्याच्या मुख्यमंत्र्यांना टक्कर देऊ शकतील असे चेहरेच तुमच्याकडे नसल्याचे मानले जातेय. त्यामुळे या कमजोरीला तुम्ही स्वत:ची ताकद असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत अाहात.
भास्कर : तुम्ही तिन्ही राज्यांत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून पुढे न करताच निवडणूक लढवत अाहात. यास पक्षाची अंतर्गत लोकशाही सांगता; परंतु सध्याच्या मुख्यमंत्र्यांना टक्कर देऊ शकतील असे चेहरेच तुमच्याकडे नसल्याचे मानले जातेय. त्यामुळे या कमजोरीला तुम्ही स्वत:ची ताकद असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत अाहात.
राहुल : अामच्याकडे खूप चेहरे अाहेत. तिन्ही राज्यांत सक्षम, अनुभवी असे अनेक नेतेही अाहेत.
भास्कर : मग हा अामचा मुख्यमंत्री असेल, असे स्पष्ट करून व तसा उमेदवार समाेर अाणून निवडणूक का नाही लढवत?
राहुल : कारण अाम्ही सर्वांना प्रोजेक्ट करत अाहाेत. काँग्रेसला प्रोजेक्ट करावे, मुद्दे निवडावेत, काँग्रेसने निवडणूक जिंकावी व नेते निवडावे, असे अाम्हास वाटते. याचा आम्हाला फायदा होत आहे.
मुस्लिमांबाबत...
भास्कर : काँग्रेस मुस्लिमांचे तुष्टीकरण करते, असा समज अाहे. तुम्ही याकडे कसे पाहता?
राहुल : काँग्रेस सर्वांचा पक्ष अाहे. सर्वांचे दु:ख समजून घेताे. हा अामचा डीएनए अाहे. या देशात प्रत्येकाचे विचार वेगळे अाहेत. सर्वांना अापले म्हणणे मांडण्याची संधी मिळते, हे या देशाचे साैंदर्य व ताकदही अाहे. भाजपने यास भलेही कमजोरी मानावी; परंतु अाम्ही त्याला देशाची शक्ती मानताे.
मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानच्या निवडणूक मुद्द्यांविषयी...
भास्कर : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये व्यापमं किंवा पीडीएससारखे मुद्दे निवडणूक मुद्दे का केले जात नाहीत?
राहुल: भाजप आणि रास्व संघ योजनाबद्ध रीतीने संस्थांवर नियंत्रण मिळवत आहेत. पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश समोर आले. त्यांनी काम करू दिले जात नसल्याचे जाहीर सांगितले. हे तुम्ही पाहिले आहे. जज लोयांचे नाव घेतले. अर्थात अमित शहांचे नाव घेतले. असाच दबाव देशातील प्रत्येक संस्थेवर आहे. व्यापमं घोटाळा भाजपच्या मप्र सरकारने सरळ-सरळ वैद्यकीय शिक्षण संस्था व रोजगारावर बेकायदा पद्धतीने ताबा मिळवल्याचे सांगणारा आहे. सुप्रीम कोर्ट, सीबीआय, निवडणूक आयोग, माध्यमे इत्यादीवर योजनाबद्ध रीतीने असे काम केले जाते. दुसरे उदाहरण पाहू. एका महिलेने उत्पन्न दुप्पट झाल्याचे सांगितले. पत्रकारांनी तिची भेट घेऊन विचारले. तेव्हा मला बळजबरीने असे म्हणायला लावल्याचे त्या महिलेने सांगितले. खोटे चव्हाट्यावर आणणाऱ्या पत्रकाराला नोकरी गमवावी लागली. वरच्या स्तरावर हे घडते. पंतप्रधान कार्यालयात हे चालते. जनतेच्या मनात एक गोष्ट स्पष्ट आहे. तीनही राज्यांतील सरकारे भ्रष्ट आहेत. सरकारचे प्रमुखही तसेच आहेत. नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येण्यापूर्वी स्वत:ला देशाचा चौकीदार असे संबोधले हाेते. चौकीदार देशाच्या हवाई दलाचा पैसा घेऊन अनिल अंबानी यांनी देत असल्याचे आता लक्षात आले आहे.
भास्कर : (मधेच थांबवत) आम्ही रफालवर तुमच्याशी प्रदीर्घ चर्चा करू. परंतु ...
राहुल : तुम्ही मुद्द्यांचा विषय मांडता. मग मुद्दे उचलते कोण ? मुद्दे आणि त्रुटींना माध्यमे उजेडात आणतात. तुम्ही सर्व संस्थांना ताब्यात ठेवले तर जनतेचा मूड मतदान यंत्राचे बटण दाबल्यानंतरच समजून येईल. अनेकदा सामान्यांच्या मनाचा आवाज, त्यातही छोटे शेतकरी, छोटे दुकानदार, तरुणांचा आवाज ऐकू येत नाही. कारण ट्रान्समीटरवर सरकारचा दबाव आहे आणि ताबाही आहे.
भास्कर : परंतु एक्स्पोज करण्याची ताकद तुमच्याकडे होती ?
राहुल: म्हणूनच तर आम्ही व्यापमं घोटाळा उजेडात आणला. ललित मोदी यांच्याशी असलेले साटेलोटे चव्हाट्यावर आणले. सुरुवातीला आम्ही रफालचा पर्दाफाश केला....{भास्कर : (मधेच थांबवून) परंतु तरीही ते निवडणूक जिंकून येत आहेत ?
राहुल : माझे पूर्ण म्हणणे ऐकून घ्या. रफालमध्ये काहीच दम नाही, असे काही पत्रकार म्हणाले. आम्ही तथ्य गोळा केले. या गोष्टी आम्ही वारंवार मांडल्या. परवा मी पत्रकार परिष

Post a Comment