पणजी - गोव्यात मुख्यमंत्रिपदी मनोहर पर्रीकर हेच कायम असतील. राज्यात नेतृत्वात कोणत्याही बदल होणार नाही, असे स्पष्टीकरण गाेव्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी दिले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांची प्रकृती बिघडलेली आहे. ते अमेरिकेतून उपचार घेऊन परतले होते. मात्र त्यांना पुन्हा एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. यामुळे गोव्यात मुख्यमंत्री बदलाच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. गोव्यातील भाजप सरकारमधील मित्रपक्षांच्या नेत्यांनी गुरुवारी नवी दिल्लीत राष्ट्रीय पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती. तसेच राज्याच्या सध्याच्या राजकीय स्थितीबाबत चर्चाही केली होती. सूत्रांनुसार, मित्रपक्षांनी मनोहर पर्री- कर यांनाच मुख्यमंत्रिपदी कायम ठेवण्याची अट घातलेली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment