0
 • News about Shastra pujanमुंबई / नागपूर : दरवर्षी विजयादशमीला पारंपरिक शस्त्रांचे पूजन करण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची परंपरा अाहे. मात्र भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश अांबेडकर यांनी संघाकडील शस्त्रसाठ्यावर अाक्षेप घेत ती पाेलिसांनी जप्त करावी, तसेच या बेकायदा शस्त्रांचे पूजन बंद करावे, या मागणीसाठी अांदाेलने केली. इतकेच नव्हे तर संघाकडे 'एके ४७' सारखी घातक शस्त्रे बेकायदा असल्याचा अाराेप करत ही शस्त्रे जप्त न झाल्यास पाेलिसांविराेधात न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला अाहे. या पार्श्वभूमीवर संघाच्या नागपुरातील पदाधिकाऱ्यांनी अापल्या भूमिकेवर ठाम राहत परंपरेनुसार शस्त्रपूजन करणारच असल्याचे स्पष्टीकरण दिले अाहे.
  'शस्त्रे बाळगणाऱ्या माओवाद्यांवर कारवाई होते, तर संघावर का नाही?' 
  मुंबई | 'आमचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला विरोध नाही. त्या दिवशी करण्यात येत असलेल्या शस्त्रपूजेलाही विरोध नाही. मात्र शस्त्रपूजनावेळी संघ ज्या अत्याधुनिक शस्त्रांचे पूजन करतो, ती कुणाची आहेत, त्यांसंदर्भातला परवाना त्यांच्याकडे आहे का, याविषयीची माहिती समोर यायला हवी. शस्त्र बाळगल्याप्रकरणी माओवाद्यांवर कारवाई होते, तर मग संघावर का होऊ नये,' असा सवाल प्रकाश अांबेडकर यांनी केला. गुरुवारी (दि.१८) होणाऱ्या शस्त्रपूजनावेळी नागपूर पोलिसांनी संघाकडील बेकायदा शस्त्रे जप्त करावीत. पोलिसांनी जप्तीची कारवाई न केल्यास आपण पोलिसांविरोधात न्यायालयात जाणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

  १ आॅक्टोबर रोजी 'भारिप' कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोर संघाकडील शस्त्रे ताब्यात घेण्यासंदर्भात आंदोलन केले होते. दसरा एक दिवसावर राहिला असताना आंबेडकर यांनी हा विषय पुन्हा छेडला आहे. त्यामुळे संघाच्या शस्त्रपूजनाकडे लक्ष लागले आहे.
  अशी शस्त्रे पोलिसांकडेही नाहीत

  संघाकडे जशी अत्याधुनिक शस्त्रे आहेत, तशी पोलिस आणि निमलष्करी दलाकडेसुद्धा नाहीत. असा दावा आंबेडकर यांनी केला. ही शस्त्रे कोणाची, ते पाेलिसांनी स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली. संघाच्या उद्याच्या शस्त्रपूजनाकडे आपले लक्ष आहे. त्यानंतरच न्यायालयात जाण्याचा निर्णय घेणार असल्याचे अॅड. अांबेडकरांनी पत्रकारांना सांगितले.
  'दसऱ्याला आयुधे, उपकरणांची पूजा ही तर परंपरा; आम्ही ती जोपासणारच' 
  नागपूर | संघाचा विजयादशमी उत्सव १८ ऑक्टोबरला आहे. या कार्यक्रमाच्या पत्रिकेत संघाकडून शस्त्रपूजनाचा उल्लेख झाला नसल्याने संघ शस्त्रपूजन टाळणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र या बातम्यांचे खंडन करत ' विजयादशमीच्या दिवशी शस्त्र अथवा आयुधांची, उपकरणांची पूजा करण्याला भारतीय संस्कृतीत मोठे महत्त्व आहे. ती परंपरा आहे. त्यामुळे विजयादशमी उत्सवात शस्त्रपूजन होणारच,' असे स्पष्टीकरणही नागपुरातील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. १४ ऑक्टोबर रोजी बाल स्वयंसेवकांच्या विजयादशमी उत्सवातही शस्त्रपूजनाचा कार्यक्रम पार पडला, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. विजयादशमीच्या दिवशी शस्त्र अथवा आयुधांची तसेच उपकरणांची पूजा करण्याची भारतीय परंपरा आहे. शस्त्रांची पूजा ही सांकेतिक असते. त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या उपकरणांची पूजाही होत असते. ज्यात वाहनांचादेखील समावेश असतो, याकडे संघाने लक्ष वेधले आहे. काही रिकामटेकडे लोक संघ शस्त्रपूजन टाळणार असल्याच्या वावड्या पसरवत असतील तर त्याला संघ काही करू शकत नाही, असेही या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मागील वर्षीही संघाच्या कार्यक्रमपत्रिकेत शस्त्रपूजनाचा उल्लेख नव्हता, असे सांगितले जाते. अनेक वर्षे संघाने विजयादशमीच्या पूर्वसंध्येलाच शस्त्रपूजन करण्याची परंपरा जोपासली होती. मात्र, अलीकडच्या काही वर्षात त्या दिवशीच शस्त्रपूजनाचे आयोजन होत असते, याकडेही संघाच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधल

Post a Comment

 
Top