फँड्री’ आणि ‘सैराट’च्या यशानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळेचा नाळ हा नवा सिनेमा येतोय. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर रिलीज झाला होता. आता या सिनेमातलं नवं गाणं रिलीज झालयं. हे गाणे यू-ट्यूबवर ट्रेंडिंगला आहे. तुम्ही देखील हा व्हिडिओ पाहा..तुम्हाला नक्कीच आवडेल.याबद्दल खुद्द नागराजने फेसबुकवरून माहिती दिलीय. त्याने लिहिलयं, '16 नोव्हेंबरला रिलीज होणारा आमचा नवा चित्रपट "नाळ" तुम्हाला आवडेल अशी आशा आहेच मात्र "नाळ" मधून पहिल्यांदाच काम करणाऱ्या चिमुकल्या श्रीनिवास पोकळेकडून माझा मित्र दिग्दर्शक सुधाकर रेड्डीने ज्या प्रकारे काम करून घेतलंय ते तुम्हाला आवडल्यावाचून पर्यायच नाही. श्रीनिवासच्या प्रेमात तुम्ही पडणार याची मला शंभर टक्के खात्री आहे. उद्या रात्री 9.30 ला "नाळ" चा ट्रेलर रिलीज होतोय. वेळ मिळाला तर नक्की बघा.'
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment