पिंपळगाव रेणुकाई- दारु पिऊन दररोज आईला मारहाण करुन घरात वाद घालण्याच्या कारणावरुन भोकरदन तालुक्यातील पळसखेडा मुर्तड येथील शिवाजी सोनुने याने मित्र सुनील नारायण सोनुने याच्या मदतीने वडील लक्ष्मण बंडू सोनुने (४७) यांचा रुमालाने गळा आवळून खून केला. यानंतर सुनील याने दुचाकी चालवली तर एकजण पाठीमागे बसून मृतदेहाला मध्येभागी ठेवून एका पेट्रोलपंपावर पेट्रोलही भरले.
हा मृतदेह बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई या गाव परिसरात नेऊन जाळला. परंतु मृतदेह अर्धवट जळाल्याने ही घटना १ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. २९ सप्टेंबर रोजी हा लक्ष्मण सोनुने यांचा खून केल्यानंतर त्या रात्री मृतदेह जाळण्यासाठी पेटून देत दुचाकीवरुन परिसरात असलेल्या एका गावात जाऊन नातेवाईकांकडे मुक्काम केला. यानंतर दुसऱ्या दिवशी ३० सप्टेंबर रोजी पिंपळगाव मुर्तड गावात येऊन दिवसभर गावात थांबले. १ ऑक्टोबर

Post a comment