0
 • Rishabh Pant to debut against Windiesगुवाहाटी - कसाेटी मालिका विजयाने जबरदस्त फाॅर्मात असलेला यजमान भारतीय संघ अाता पाहुण्या विंडीजविरुद्धची वनडे सिरीजही जिंकण्याच्या इराद्याने मैदानावर उतरणार अाहे. भारत अाणि विंडीज यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला अाज रविवारपासून सुरुवात हाेईल. या मालिकेतील सलामीचा वनडे सामना गुवाहाटीच्या मैदानावर अायाेजित करण्यात अाला. या सामन्यातून भारताच्या युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला अांतरराष्ट्रीय वनडेत दमदार पदार्पणाची संधी अाहे. ताे मर्यादित षटकांच्या फाॅरमॅटमध्ये खेळणारा भारताचा २२४ वा खेळाडू ठरेल. या सामन्याच्या पूर्वसंध्येला १२ सदस्यीय संघाची घाेषणा करण्यात अाली. या संघात ऋषभची फलंदाजांच्या भूमिकेसाठी निवड झाली. याच संघात माजी कर्णधार व यष्टिरक्षक धाेनीही सहभागी अाहे. भारताने विंडीजविरुद्धची दाेन कसाेटी सामन्यांची मालिका २-० ने अापल्या नावे केली.


  सलामीच्या वनडेसाठी जाहीर झालेल्या संघात सहा फलंदाज, रवींद्र जडेजाच्या रूपात एक अाॅलराउंडर अाणि पाच गाेलंदाजांची निवड करण्यात अाली. यातून शमी अाणि खलील अहमद यांच्यापैकी एक जण या वनडेत खेळताना दिसणार अाहे. यामुळे विजयाचा दावा मजबुत अाहे.

  वेगवान १० हजारांची काेहलीला संधी 
  टीम इंडियाच्या विराट काेहलीला अाता वनडे करिअरमध्ये सर्वात वेगवान १० हजार धावांचा पल्ला गाठण्याची संधी अाहे. त्याच्या नावे अाता २११ वनडेतील २०३ डावांत ९७७९ धावांची नाेंद अाहे. अाता त्याला १० हजार धावा पूर्ण करण्यासाठी २२१ धावांची गरज अाहे. यातून त्याच्या नावे सर्वात वेगवान १० हजार धावा काढण्याचा विक्रम नाेंदवला जाईल. यासह ताे सचिनलाही या विक्रमात मागे टाकू शकेल. सचिनच्या नावे २५९ डावांत १० हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम नाेंद अाहे. तसेच धवनला वनडेत पाच हजार धावा पूर्ण करण्यासाठी १७७ धावांची अावश्यकता अाहे.

  संघ 
  भारत 
  : काेहली (कर्णधार), शिखर धवन, राेहित शर्मा, रायडू, ऋषभ पंत, धाेनी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, उमेश यादव, माे.शमी/खलील अहमद.

  वेस्ट इंडीज : हाेल्डर (कर्णधार), सुनील अाम्ब्रिस, पाॅवेल, शाई हाेप, शिमरन हेटमेयर, सॅम्युअल्स, राेवमान पाॅवेल, नर्स, किमाे पाॅल, देवेंद्र बिशू, अल्जारी जाेसेफ/केमार राेच.

Post a Comment

 
Top