0

  • हैदराबाद -‘वायएसअार’ काँग्रेसचे प्रमुख जगनमाेहन रेड्डी यांच्यावर गुरुवारी विशाखापट्टणम विमानतळावर एका व्यक्तीने चाकूहल्ला केला. यात रेड्डी यांच्या दंडाला जखम झाली. हल्लेखाेर विमानतळाच्या उपाहारागृहात काम करत असल्याची माहिती अाहे. विमानतळाच्या प्रतीक्षालयात रेड्डी बसले असताना सेल्फी घेण्याच्या बहाण्याने त्यांच्याजवळ येऊन अाराेपीने हल्ला केला. पाेलिसांनी त्याला अटक केली.
    त्याच्याजवळील चाकूही जप्त करण्यात अाला. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच रेड्डींच्या समर्थकांनी विमानतळासमाेर निदर्शने केली. नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभू यांनी घटनेच्या चाैकशीचे अादेश दिले अाहेत.
    सुरक्षा भक्कम : सीअायएसएफ 
    रेड्डींच्या सुरक्षेत काेणतीही कसूर नव्हती, असे स्पष्टीकरण केंद्रीय अाैद्याेगिक सुरक्षा दलाने (सीअायएसएफ) दिले अाहे. ही अचानक घडलेली घटना अाहे. हल्लेखाेर विमानतळाच्या उपाहारगृहात काम करत हाेता. यापूर्वी विमानतळावर अशा घटना घडलेल्या नाattack on Jagmohan Reddy at Vishakhapatnam airport by sailing with selfies
  • हीत. हल्लेखाेराला तातडीने अटक केल्याचेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top