पुणे- मराठा समाजांच्या मागण्यासाठी गेल्या दोन वर्षांत राज्यात ५८ मूक माेर्च काढण्यात अाले. मात्र, केवळ अाश्वासनांवर मराठा समाजाची बाेळवण झाली अाहे. त्यामुळे मराठा क्रांती माेर्चानंतर मराठ्यांचा स्वत:चा पक्ष असावा, असा विचार पुढे अाला असून त्या दृष्टीने सध्या राज्यभरात विविध ठिकाणी बैठका घेण्यात येत अाहेत. पाडव्याला रायरेश्वर मंदिरात मराठा समाजाच्या पक्षाची स्थापना केली जाणार असल्याची माहिती मराठा समाजाच्या पक्षाचे संयाेजक सुरेशदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पाटील म्हणाले, मराठा समाजाच्या या पक्षात काेणाकडेही अध्यक्षपद नसून १०० जणांची काेअर कमिटी तयार करण्यात अाली आहे. या काेअर कमिटीत राज्यातील निवृत्त अायएएस, अायपीएस अधिकारी, समाजसेवक, उद्याेजक, ज्येष्ठ पत्रकार यांचा समावेश आहे. याशिवाय राज्यभरातील मराठा समाजात काम करणाऱ्या विविध २२ संघटनांचाही पक्ष स्थापनेसाठी पाठिंबा प्राप्त झाला असून २० पेक्षा जास्त अाजी-माजी अामदारदेखील पक्षासाेबत काम करण्यास इच्छुक असल्याचे ते म्हणाले. सातारा येथील खासदार उदयनराजे भोसले हे काेणत्याही पक्षातून निवडणूक लढले तरी त्यांना अामचा बिनाशर्त पाठिंबा राहणार असल्याचे ते म्हणाले.
Post a Comment