- मुंबई - एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन यंदा दिवाळीनिमित्त एक अाठवडा अाधी म्हणजे एक नाेव्हेंबरलाच करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला अाहे. तसेच या पगारासाेबत वेतनवाढ अाणि थकबाकीच्या 48 हप्त्यांपैकी पाच हप्तेही देण्यात येतील.यंदा अशी परिस्थिती येऊ नये म्हणून एसटी महामंडळाने गेल्याच अाठवड्यात कर्मचाऱ्यांना 25000 रुपये, अधिकाऱ्यांना 5 हजार रुपये दिवाळी भेट देण्याचा निर्णय जाहीर केला हाेता. यासाेबत अधिकाऱ्यांना 10% अंतरिम वेतनवाढ व एसटी कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ जाहीर केली. ही वेतनवाढ अाॅक्टाेबरपासून लागू हाेईल. वेतन थकबाकी रकमेच्या 48 पैकी 5 हप्ते अाॅक्टाेबर महिन्याच्या वेतनासाेबत मिळतील. उर्वरित 43 हप्ते नाेव्हेंबरच्या वेतनासाेबत म्हणजेच डिसेंबरपासून मासिक एक हप्ता याप्रमाणे मिळतील. थकबाकीत वाढीव वेतनवाढ, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व रजा राेखीकरण यांचा समावेश असेल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment