0
 • Vetran Actor Raaj Kumar Life Interesting facts on his 92 Birth anniversaryमुंबई - राजकुमार हे गतकाळातील बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांचा अभिनय आणि डायलॉग डिलिव्हरी जेवढी भन्नाट होती, तेवढेच त्यांच्या आयुष्यातील किस्सेसुध्दा. ते पडद्यावरच नव्हे तर ख-या आयुष्यातसुद्धा स्पष्टवक्ते होते. त्यांना डायलॉग आवडला नाही तर ते कॅमे-यासमोच डायलॉग बदलत होते. राजकुमार यांचा आज वाढदिवस आहे. ते आज हयात असते तर त्यांनी वयाची 92 वर्षे पूर्ण केली असती.


  राजकुमार यांच्या फटकळ बोलत असल्याचे सगळ्यांनाच ठाऊक आहे. अमिताभ यांनासुध्दा त्यांचे फटकळ बोलणे ऐकावे लागले होते. एका पार्टीत राजकुमार मेगास्टार अमिताभ बच्चन यांना भेटले. त्यांनी बिग बींच्या विदेशी सुटची प्रशंसा केली. तेव्हा अमिताभ आनंदी होऊन त्या ठिकाणाचा पत्ता सांगायला लागले जिथून त्यांनी सूट खरेदी केला होता. बिग बी काही बोलण्यापूर्वीच राजकुमार म्हणाले, 'मला तिथून काही पडदे शिवायचे आहेत.' हे ऐकून बिग बी फक्त हसले.
  गोविंदाच्या शर्टपासून बनवला होता रुमाल 
  राजकुमार आणि गोविंदा 'जंगबाज' सिनेमाचे शूटिंग करत होते. गोविंदाने एक सुंदर शर्ट घातलेले होता. शूटिंग संपल्यानंतर दोघे एकत्र गप्पा मारत होते. तेव्हा राजकुमार गोविंदाला म्हणाले, 'यार, तुझा शर्ट शानदार आहे.' गोविंदा इतक्या मोठ्या आर्टिस्टकडून अशी प्रशंसा ऐकून आनंदी झाला. गोविंदा राजकुमार यांना म्हणाला, 'सर तुम्हाला हा शर्ट आवडला असेल तर तुम्हाला ठेऊन घ्या.' राजकुमार यांनी गोविंदाकडून शर्ट घेतला. राजकुमार त्याला शर्ट घालणार याचा गोविंदाला आनंद झाला. परंतु असे झाले नाही. त्यांनी त्या शर्टचा रुमाल बनवून खिशात ठेवला.
  झीनतला म्हणाले, चित्रपटांत प्रयत्न का करत नाहीस..
  झीनत अमान फिल्म इंडस्ट्रीची प्रसिध्द अभिनेत्री होती. देवानंद स्टारर 'हरे रामा हरे कृष्णा'चे 'दम मारो दम' गाण्याने सर्वत्र धूम घातली होती. झिनत एका गाण्याने रात्रीतून स्टार झाली होती. निर्माता तिला आपल्या सिनेमांत साइन करण्यासाठी उतावीळ असायचे. याच काळात एका पार्टीत झिनतची भेट राजकुमारसोबत झाली. झीनतला वाटले, त्यांच्याकडूनही तिला प्रशंसा मिळेल. परंतु उटलेच झाले. राजकुमार झीनतला म्हणाले, 'तू इतकी सुंदर दिसतेस. सिनेमांत येण्याचा प्रयत्न का करत नाहीस?' हे ऐकून झिनतची काय अवस्था झाली असेल, याचा अंदाजा तुम्ही लावू शकता.
  डॅनीची खिल्ली...
  अनेक गोष्टी आहेत, ज्यावरून राजकुमार स्पष्टवक्ते असल्याचे समोर येते. एकदा त्यांच्याकडे एक निर्माता आला. त्याला राजकुमार यांना त्यांच्या सिनेमात घ्यायचे होते. पैसे कमी देणार होता. राजकुमार यांनी विचारले, 'किती पैसे देशील?' निर्मात्याने त्याचे म्हणणे सांगितले. यावर राजकुमार म्हणाले, इतक्या पैशात गोरखाला घेऊन जा. राजकुमार यांचा संकेत डॅनी डेन्जोंगपाकडे होता.
  धर्मेंद्र-जितेंद्र आणि माकड!
  बॉलिवूडमध्ये एक किस्सा खूप फेमस आहे, की राजकुमार कोणत्याही कलाकारांना त्यांच्या योग्य नावाने बोलवत नव्हते. त्यामुळे अनेक कलाकारांसोबत त्यांचे मतभेद निर्माण झाले होते. त्यांच्या ख-या स्वभावाविषयी ज्यांनी माहित व्हायचे, ते त्यांचे फॅन व्हायचे. राजकुमार धर्मेंद्रला जितेंद्र आणि जितेंद्रला धर्मेंद्रच्या नावाने बोलवत होते. एकदा धर्मेंद्र यांना खूप राग आला. तेव्हा राजकुमार यांनी उत्तर दिले होते, 'राजेंद्र असो अथवा धर्मेंद्र किंवा जितेंद्र किंवा एखादे माकड, काय फरक पडतो. जानी राजकुमारसाठी सगळे सारखेच आहेत.'
  'जंजीर' न करण्याचे कारण..
  प्रकाश मेहरा यांना 'जंजीर' सिनेमात राजकुमार यांना घ्यायचे होते. परंतु त्यांनी ही ऑफर नाकारली. राजकुमार यांनी यामागे दोन कारणे सांगितली होती. पहिले म्हणजे, प्रकाश मेहराचा चेहरा आवडत नाही आणि दुसरे कारण, 'प्रकाश मेहराजवळ गेल्यावर बिजनौरी तेलाचा वास येतो, सिनेमा तर दूरच मला तुझ्यासोबत एक मिनिट उभे राहणेसुद्धा सहन होणार नाही.' असे राजकुमार म्हणाले होते.
  बप्पीदांना म्हणाले होते, मंगळसूत्रच राहिले..!
  संगीतकार बप्पी लहरी यांचे नाव ऐकताच सोन्याने मढलेल्या एका व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर येतो. एका पार्टीत त्यांची भेट राजकुमार यांच्याशी झाली होती. सवयीनुसार बप्पी सोने घालून आले होते. राजकुमार यांनी त्यांना खालून वरपर्यंत पाहिले आणि म्हणाले, 'वाह शानदान, एकापेक्षा एक सोन्याचे दागिने घातलेत. केवळ एका मंगळसूत्राची कमी होती. तेही घालायचे असते.' हे ऐकून बप्पी राजकुमार यांच्याकडे फक्त पाहत राहिले.
  पोलिस ते हीरो 
  राजकुमार मुंबईच्या ज्या ठाण्यात कार्यरत होते. तिथे नेहमी सिनेजगातील लोकांची ये-जा असायची. एकदा पोलिस स्टेशनमध्ये निर्माता बलदेव दुबे काही कामानिमित्त आले होते. ते राजकुमार यांच्या बोलण्याच्या अंदाजाने प्रभावित झाले आणि त्यांनी त्यांच्या 'शाही बाजार' सिनेमात राजकुमार यांना अभिनेता म्हणून काम करण्यासाठी ऑफर केले. राजकुमार यांनी लगेच होकार दिला. पोलीस उपनिरीक्षकाच्या पदाचा राजिनामा दिला आणि सिनेमाचे शूटिंग सुरु केले.
  नखऱ्यांसाठी होते प्रसिध्द.. 
  राजकुमार यांच्याविषयी इतके किस्से आहेत, जेवढे कदाचितच दुस-या स्टार्सविषयी असतील. राजकुमार ख-या आयुष्यातसुध्दा राजकुमारांसारखे वागत होते. 'नीलकमल' सिनेमाच्या पहिल्या शॉटमध्ये राजकुमार यांनी खूप नखरे दाखवले आणि खोटे दागिने घालण्यास नकार दिला होता. निर्मात्याने घाई घाईत कुठूनतरी किलोभर दागिने आणले आणि हा शॉट पूर्ण केला होता.


Post a Comment

 
Top