0
  • पुणे -माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून नजरकैदेत असलेल्या व्हर्नन गोन्साल्विस, अॅड. सुधा भारद्वाज आणि अरुण फरेरा यांचा जामीन अर्ज शुक्रवारी पुणे सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशाेर वढणे यांनी फेटाळून लावला. शिवाय या कार्यकर्त्यांच्या नजरकैदेची मुदतही शुक्रवारीच संपली. त्यामुळे जामीन फेटाळला जाताच पोलिसांनी गोन्साल्विस आणि फरेरा यांना अटक केली. तर सुधा भारद्वाज यांना शनिवारी सकाळी ताब्यात घेऊन अटक दाखवली जाईल.


   या प्रकरणातील अन्य दोन संशयित डॉ. सुरेंद्र गडलिंग आणि शाेमा सेन यांच्या जामीन अर्जावर १ नोव्हेंबर राेजी सुनावणी होणार असून दाेघांच्या अर्जास एक अाठवड्याची स्थगिती न्यायालयाने दिलेली अाहे. गोन्साल्विस व फरेरा यांना शनिवारी कोर्टात हजर केले जाईल.
   नजरकैद एक आठवडा वाढवण्याची करणार मागणी
   दरम्यान, याप्रकरणी अाराेपींचे वकील सिद्धार्थ पाटील अाणि अॅड.राहुल देशमुख यांनी पुणे सत्र न्यायालयाच्या या निकालाविराेधात मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले. या तिघांच्या नजरकैदेला एक अाठवड्याची मुदतवाढ करण्यात यावी, अशी मागणी उच्च न्यायालयात करणार असल्याचे ते म्हणाले.
   सबळ पुरावे असल्याचा पोलिसांचा दावा
   जप्त कागदपत्रांत अाराेपींनी बंदी घालण्यात अालेली संघटना सीपीअाय माअाेवादी यांच्या नेत्यांशी पत्रव्यवहार केल्याचा अाणि विविध कारवाईत त्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली अाहे. देशविराेधी कारवाईत त्यांचा सहभाग असल्याचा या सर्वांवर आरोप असून शस्त्रखरेदी अाणि सुरक्षा दलांवर हल्ल्याच्या कटाबाबतचे पुरावे त्यांच्याकडे सापडले अाहेत. पिंपरी ठाण्यात दाखल मिलिंद एकबाेटे अाणि संभाजी भिडे यांचे विराेधातील व विश्रामबाग ठाण्यात एल्गार परिषदेच्या अनुषंगाने दाखल गुन्हा यात फरक असून एकबाेटे जा
   एप्रिलमध्ये टाकले होते छापे : माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून एप्रिल २०१८ मध्ये तपास यंत्रणेने देशभरात विविध ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी सात जणांच्या घरातून काॅम्प्युटर, लॅपटाॅप, मेमरीकार्ड, पेनड्राइव्ह जप्त केले हाेते. ते तपासणीकरिता फाॅरेन्सिक सायन्स लॅबाेरेटरीकडे पाठवले. त्यानंतर जून २०१८ मध्ये पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. पुन्हा अाॅगस्ट २०१८ मध्ये एकाच वेळी छापे टाकून अॅड. सुधा भारद्वाज,व्हर्नोन गाेन्साल्विस, अरुण फरेरा, गाैतम नवलखा, वरवरा राव यांना अटक करण्यात aaheGonzalev, Ferreira arrested for rejecting bail application
  • मिनावर अाहे. पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी ही घटना अचानक घडून जमाव हिंसक बनल्याचे सांगण्यात अाले अाहे.

  या प्रकरणातील अन्य दोन संशयित डॉ. सुरेंद्र गडलिंग आणि शाेमा सेन यांच्या जामीन अर्जावर १ नोव्हेंबर राेजी सुनावणी होणार असून दाेघांच्या अर्जास एक अाठवड्याची स्थगिती न्यायालयाने दिलेली अाहे. गोन्साल्विस व फरेरा यांना शनिवारी कोर्टात हजर केले जाईल.
  नजरकैद एक आठवडा वाढवण्याची करणार मागणी
  दरम्यान, याप्रकरणी अाराेपींचे वकील सिद्धार्थ पाटील अाणि अॅड.राहुल देशमुख यांनी पुणे सत्र न्यायालयाच्या या निकालाविराेधात मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले. या तिघांच्या नजरकैदेला एक अाठवड्याची मुदतवाढ करण्यात यावी, अशी मागणी उच्च न्यायालयात करणार असल्याचे ते म्हणाले.
  सबळ पुरावे असल्याचा पोलिसांचा दावा
  जप्त कागदपत्रांत अाराेपींनी बंदी घालण्यात अालेली संघटना सीपीअाय माअाेवादी यांच्या नेत्यांशी पत्रव्यवहार केल्याचा अाणि विविध कारवाईत त्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली अाहे. देशविराेधी कारवाईत त्यांचा सहभाग असल्याचा या सर्वांवर आरोप असून शस्त्रखरेदी अाणि सुरक्षा दलांवर हल्ल्याच्या कटाबाबतचे पुरावे त्यांच्याकडे सापडले अाहेत. पिंपरी ठाण्यात दाखल मिलिंद एकबाेटे अाणि संभाजी भिडे यांचे विराेधातील व विश्रामबाग ठाण्यात एल्गार परिषदेच्या अनुषंगाने दाखल गुन्हा यात फरक असून एकबाेटे जामिनावर अाहे. पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी ही घटना अचानक घडून जमाव हिंसक बनल्याचे सांगण्यात अाले अाहे.
  एप्रिलमध्ये टाकले होते छापे : माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून एप्रिल २०१८ मध्ये तपास यंत्रणेने देशभरात विविध ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी सात जणांच्या घरातून काॅम्प्युटर, लॅपटाॅप, मेमरीकार्ड, पेनड्राइव्ह जप्त केले हाेते. ते तपासणीकरिता फाॅरेन्सिक सायन्स लॅबाेरेटरीकडे पाठवले. त्यानंतर जून २०१८ मध्ये पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. पुन्हा अाॅगस्ट २०१८ मध्ये एकाच वेळी छापे टाकून अॅड. सुधा भारद्वाज,व्हर्नोन गाेन्साल्विस, अरुण फरेरा, गाैतम नवलखा, वरवरा राव यांना अटक करण्यात आली.

Post a Comment

 
Top