0
मुंबई- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळच्या असलेल्या उत्तर मध्य मुंबईच्या माजी खासदार व सुनील दत्त यांच्या कन्या प्रिया दत्त यांना काँग्रेसने अखिल भारतीय कार्यकारणी समितच्या सचिव पदावरुन कार्यमुक्त केले आहे. चार वर्षांपासुन त्या पक्षात बिल्कुल सक्रीय नव्हत्या, त्यामुळे प्रिया यांचे पद काढण्यात आल्याचे मुंबई काँग्रेसमधील नेत्यांचे म्हणणे आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी 26 सप्टेबर रोजी पत्र पाठवून प्रिया दत्त यांना कार्यमुक्त करत असल्याचे सांगितले. गेहोलोत यांनी पत्रात प्रिया यांच्या कामांची प्रशंसा केली असून यापुढे आपल्या कामाची पक्षाला गरज असल्याचे त्यात म्हटले आहे.
मी निराश नाही- प्रिया दत्त
प्रिया दत्त यांनी ही माहिती रविवारी ट्‍वीट करुन सांगितली. ‘मी निराश नाही. पक्षात चालणारी ही निरंतर प्रक्रिया आहे. या निर्णयाने तरुणांना संधी मिळेल’, असे त्यांनी पक्षाच्या निर्णयावर मत व्यक्त केले आहे

2005 आणि 2009 अशा दोन वेळा प्रिया उत्तर मध्य मुंबई या मुस्लीम बहुल मतदारसंघातून लोकसभेवर गेल्या होत्या. दत्त कुटुंबांचा हा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. 2014 मध्ये प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम यांनी दत्त यांचा पराभव केला होता.
निवडणुकीत पराभूत झाल्यापासून प्रिया मतदारसंघ आणि पक्षातही निष्क्रीया होत्या. त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे मागच्या सहा महिन्यापासून मुंबई आणि दिल्लीत चर्चा होत्या. प्रिया यांच्या मतदारसंघातून लोकसभा लढविण्यास काँग्रेसचे चांदीवलीचे आमदार नसीम खान आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंह यावेळी इच्छुक आहे.
मल्लिकार्जून खर्गे राज्याचे प्रभारी झाल्यानंतर दत्त यांच्या कार्यमुक्तची निर्णय झाला आहे. काँग्रेसमध्ये एकूण 68 सचिव आहेत. महाराष्ट्रातून प्रिया यांच्याबरोबर वर्षा गायकवाड, अमीत देशमुख आणि यशोमती ठाकूर सचिवपदी कार्यरत होते.
- ही ठरली कारणे
1. प्रिया दत्त या मतदारसंघातील कार्यक्रम काँग्रेस पक्षाऐवजी आपल्या मातोश्री यांच्या नावे असलेल्या नर्गीस दत्त फौंडेशनच्या बॅनरखाली घेत होत्या. 
2. राहुल गांधी मुंबईत अनेक आले. पण, एकदाही प्रिया या राहुल यांच्या दौऱ्यात उपस्थित नव्हत्या. 
3. काँग्रेस पक्षात आणि स्वत:च्या मतदारसंघात प्रिया गेली साडेचार वर्ष बिल्कुलच सक्रीय नव्हत्या.
4. सक्रीय नसणाऱ्यांना पक्ष संघटनेतून हटवण्याचे राहुल गांधी यांचे धोरण आहे. सुशिलकुमार शिंदे आणि जर्नादन व्दिवेदी यांना याच पद्धतीने कार्यमुक्त करण्यात आले होते.
5. प्रिया दत्त पक्षात नाराज होत्या. त्या शिवसेनेत जाणार असल्याच्या सहा महिन्यापासून चर्चा होत्या.
  • प्रिया दत्त यांनी वडील सुनील दत्त यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. प्रिया दत्त प‍हिल्यांदा 2005 मध्ये खासदार बनल्या होत्या. त्यानंतर 2009 मध्येही त्यांनी मुंबई नॉर्थ-सेंट्रल लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविली होती. मात्र, 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारी पूनम महाजन यांच्याकडून प्रिया दत्त यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

    काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दत्त यांचा अथक परिश्रम आणि पक्षाच्या सचिवपदावरून दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली आहे.

    • former congress mp priya dutt relieves as the post of secretary of AICC

Post a comment

 
Top