0
भाटमरळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला उपसभापती जितेंद्र सावंत यांनी सरप्राईज व्हिजीट दिली. त्या व्हिजीटमुळे शिक्षकांची तारांबळ उडाली होती. त्यांनी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले. त्यामध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांमध्ये चुणूक दिसली, तर पाचवी सहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये एवढी प्रगती न जाणवल्याने त्यांनी शिक्षकांनी गुणवत्ता वाढवण्याकडे अजून लक्ष द्यावे, असा शेरा मारला. त्यांच्या या अचानक भेट देण्याच्या उपक्रमामुळे सातारा तालुक्यातील शिक्षकही अलर्ट झाले आहेत.
सातारा तालुक्याची गुणवत्ता पूर्णपणे ढासळली असून त्याकडे कटाकाक्षाने सुधारणा व्हावी, तालुक्यातील भावी पिढीला चांगले शिक्षण मिळावे याकरिता उपसभापती सावंत यांनी तालुक्यातील शाळांना अचानक भेटी देण्याचा सपाटा लावला आहे.
गावच्या मानाने या शाळेचा पट अतिशय कमी असल्याची खंत सावंत यांनी व्यक्त केली. शाळेला भौतिक सुविधा असल्या तरीही शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांमध्ये हुशारपणा दिसला.
त्यांच्या भेटीमुळे शिक्षकांची भंबेरी उडाली होती. काही दिवसांपूर्वी गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी याच शाळेला भेट दिली होती. त्या शाळेबाबत कौडकौतुकही केले होते. तसेच इतिहास संशोधक समजले जाणारे जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव चव्हाण यांनीही या शाळेत जावून फोटोसेशन केले होते. उपसभापती जितेंद्र सावंत यांनी दिलेल्या या अचानक भेटीमुळे शिक्षकांची तसेच शाळेतील उपस्थित सर्वच कर्मचाऱयांची चांगलीच भंबेरी उडाली असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

Post a Comment

 
Top