- बीड- शरीर संबंधास पत्नीने नकार दिल्याने पतीने तिला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत गंभीर भाजल्या गेलेल्या महिलेचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
काय आहे प्रकरण?सायरा पठाण असे मृत महिलेचे नाव होते. सायराकडे पती अयूब पठाण याने एके दिवशी रात्री सेक्स करण्याची मागणी केली. मात्र, सायराने त्याला नकार दिला. तब्बेत ठीक नसल्याचे सांगितले. मात्र, अयूबने तिला समजून घेतले नाही. रात्री तिच्यासोबत वाद घातला. संतापाच्या भरात अयूबने सायराच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले.आगीत होरपळत असलेली सायरा हिने मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र, रात्रीची वेळ असल्याने तिला मदतीला कोणीही धावून आले नाही. गंभीर अवस्थेत तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान सायराचा मृत्यू झाला. पोलिसांनी सायराने दिलेल्या जबाबावरून तिचा पती अयूब पठाण याला अटक केली आहे.संतापाच्या भरात अयूबने सायराच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment