0
औरंगाबाद- विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांचा आज (5 ऑक्टोबर) वाढदिवस... एक कर्तव्यतत्पर पोलिस अधिकारी म्हणून विश्वास नांगरे पाटील यांचे नाव घेतले जाते. महाराष्ट्रातील तरुणाईपुढेही ते आदर्श आहेत. युवकांना मार्गदर्शन करण्‍यासाठी त्‍यांनी लिहीलेल्‍या 'मन मे है विश्वास' या पुस्‍तकाला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. विश्‍वास यांच्‍या आयुष्‍यात त्‍यांच्‍या पत्नी रुपालीताई यांचे सहकार्य, पाठिंबाही मोठा आहे. नवऱ्याची मैत्रीण, सहकारी म्हणून सक्षमपणे त्‍या आपली भूमिका पार पाडतात. या संग्रहात जाणून घेऊया विश्‍वास नांगरे पाटील व रुपालीताई यांच्‍याविषयी काही खास बाबी.


विश्‍वास यांना औरंगाबादने दिले वेगळे वळण..
विश्‍वास नांगरे पाटील यांचे करिअर व वैवाहिक जीवनाची सुरूवातच औरंगाबादेतून झाली. आयपीएस झाल्यावर 1999 मध्ये त्यांची प्रोबेशनवर पहिली बदली औरंगाबाद जिल्ह्यात झाली. फुलंब्री, कन्नड आणि सिल्लोड या विभागात त्यांनी काम केले. कन्नडचे कल्याण औताडे यांच्याशी विश्‍वास यांची मैत्री झाली. त्यांनीच पद्माकर मुळे यांची मुलगी रूपालीताई हिच्या लग्नाचा प्रस्ताव आणला होता. कल्याण औताडे यांनी मुळे कुटुंबीयांशी बोलणी करून मुलगी पाहण्याचा कार्यक्रम निश्चित केला. विश्वास त्‍यांच्‍या मित्रांसोबत मुलगी बघायला गेले.वडिलांचा विरोध मावळला..
नांगरे पाटील यांच्या वडिलांना मराठवाड्यातील मुलगी मान्य नव्हती. कोल्हापूर, सांगली किंवा सातार्‍याची मुलगी सून म्हणून आण, असा खाक्याच त्यांनी दिला होता, पण अखेर विश्वास यांच्या पसंतीला मान देत वडिलांनी लग्नाला होकार दिला.
Happy Birthday Vishwas Nangare Patil Story in Marathi

Post a comment

 
Top