0
  • Business Women Rape Case in Puneपुणे- लग्नाचे आमिष दाखवून पुण्यातील उद्योजक तरुणीवर मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ओडिशाच्या तरुणाने बलात्कार केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. अमित रंजन महापात्रा (30, सध्या रा. बाणेर, पुणे, मूळ रा. ओडिशा) असे तरुणाचे नाव आहे. आरोपीविरोधात वानवडी पोलिसांत बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अमित याने 7 जुलै 2018 ते 5 ऑक्टोबर 2018 दरम्यान घरातील लोकांच्या समक्ष तरुणीसोबत फिल्मीस्टाइल मंगळसूत्र व कुंकू लावून लग्न केल्याचा बनाव केला. त्यानंतर त्याने मुंबईच्या जुहू भागातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर तिला शिवीगाळ करून बेदम मारहाणही केली. तसेच वेळोवेळी 4 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचे तरुणीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आह

Post a Comment

 
Top