- नवी दिल्ली - नक्षलींशी संबंधांच्या आरोपाखाली अटकेतील ४ आराेपी व अॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ देण्याचा पुणे न्यायालयाचा निर्णय बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला होता. त्याविरुद्ध महाराष्ट्र सरकारने गुरुवारी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली. शुक्रवारी या प्रकरणावर सुनावणी हाेईल.
अटकेतील आरोपींवि - रुद्ध आराेपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांना पुणे कोर्टाने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. त्याला हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. हायकोर्टाने ही मुदतवाढ रद्दबातल ठरवली होती. त्याला आता सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. पुणे पोलिसांनी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात वकील सुरेंद्र गडलिंग, नागपूर विद्यापीठातील इंग्रजीच्या प्राध्यापिका शोमा सेन, दलित कार्यकर्ते सुधीर ढवळे, सामाजिक कार्यकर्ते महेश राऊत आणि केरळच्या रहिवासी रोना विल्सन यांना कोरेगाव भीमातील ३१ डिसेंबर २०१७ व १ जानेवारी २०१८ मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात जूनमध्ये अटक केली होती.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment