0
मुंबई - बॉलीवूडमध्ये सध्या MeToo मोहिमेत दररोज नवनवे खुलासे होत आहेत. यात अनेक सेलिब्रिटींची नावे समोर आलेली आहेत. तनुश्री दत्ताने नाना पाटेकरवर आरोप केल्यापासून या मीटू मोहिमेला सुरुवात झाली. परंतु आता त्याच तनुश्रीवर राखी सावंतने अतिशय गंभीर आरोप केला आहे.

काय म्हणाली राखी?

पत्रकार परिषदेत राखी म्हणाली की, मीटू-मीटू खूप होत आहे, आता SheToo चीही वेळ आली आहे. राखी पुढे म्हणाली की, तनुश्री दत्ताने माझा वारंवार बलात्कार केला आहे. तुम्ही म्हणाल हे कसं होऊ शकतं? एक मुलगी दुसरीचा रेप कसा करू शकते? परंतु तुम्ही माहिती असेल की, कलम 377 लागू झाले आहे. गे आणि लेस्बियन संबंधांना सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे.

तनुश्रीवर गंभीर आरोप करत राखी म्हणाली की, तिने मुंडण का केले होते तुम्हाला माहिती नसेल. ती प्रत्यक्षात एक पुरुष आहे. ती 12 वर्षांपूर्वी माझी बेस्ट फ्रेंड होती. तिने मला बऱ्याचदा रेव्ह पार्टीत नेले अन् तेथे सिगारेट रिकामी करून हिरव्या रंगाचा पदार्थ तिच्यात भरला. तिच्यासोबत मलाही ओढायला लावली.

राखीने सांगितली आपबीती

राखीने माध्यमांसमोर सांगितले की, मी आज माझी आपबीती सांगत आहे. तनुश्री एक लेस्बियन आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे फक्त पुरुषच बलात्कार करत नसतात, तर मुलगीही मुलीवर बलात्कार करत असते.

तथापि, यापूर्वी राखी सावंतने तनुश्री दत्ताचे नाना पाटेकर यांच्यावरील आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. परंतु आज तिने माध्यमांसमोर तनुश्रीवर गंभीर आरोप करत हे सर्व सत्य असल्याचे सांगितले.
Tanushree Dutta raped me multiple times and is a boy from inside, says Rakhi Sawant

Post a Comment

 
Top