0
  • जळगाव- काँग्रेस अाणि राष्ट्रवादी अाघाडीत जळगाव जिल्ह्यातील रावेर लाेकसभा मतदारसंघावरून गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू असलेली रस्सीखेच अजूनही कायम अाहे. या वर्षी ही जागा काँग्रेसकडे घेण्याच्या हालचाली सुरू असताना राष्ट्रवादीने या मतदारसंघात तयारी सुरू केल्याने दाेन्ही पक्षांत स्पर्धा वाढली अाहे.

   जिल्ह्यातील जळगाव अाणि रावेर हे दाेन्ही लाेकसभा मतदारसंघ जागा वाटपाच्या फाॅर्म्युल्यात राष्ट्रवादीच्या वाट्याला अाले अाहेत. दाेन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याने काँग्रेसला स्थानिक पातळीवर अडचणी येत असून कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह असल्याची स्थानिक काँग्रेसींची अाेरड अाहे. किमान एक जागा तरी काँग्रेसच्या वाट्याला द्यावी म्हणून पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू अाहेेत. रावेरच्या बदल्यात काँग्रेसने राष्ट्रवादीला जालना मतदारसंघ साेडण्याची तयारी दर्शविली हाेती. सन २०१४च्या लाेकसभा निवडणुकीत माजी खासदार डाॅ. उल्हास पाटील यांनी रावेर मतदारसंघाची जागा काँग्रेसला मिळावी म्हणून प्रयत्न केले. जागा न सुटल्याने त्यांनी याच मतदारसंघात अपक्ष उमेदवारी केली हाेती. तर काँग्रेसकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील असलेले माजी अामदार मनीष जैन यांनी जागा काँग्रेसला न सुटल्याने एेनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी केली हाेती. या वेळी तरी ही जागा मिळावी म्हणून चार दिवसांपूर्वीच फैजपूर येथे प्रारंभ झालेल्या काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या जाहीर सभेत काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नेत्यांकडे रावेरची जागा साेडण्याची मागणी केली अाहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशाेक चव्हाण, लाेकसभेतील नेते तथा महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनीही रावेरसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. अशाेक चव्हाण यांनी जागा वाटपाच्या चर्चेत रावेरसाठी तुमची वकिली करेल, असे अाश्वासन स्थानिक पदाधिकाऱ्यांना जाहीरपणे दिले अाहे.

   किमान एक जागा तरी काँग्रेसच्या वाट्याला द्यावी म्हणून पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न 
   १ काँग्रेसने ही जागा मिळवण्यासाठी कंबर कसली असताना राष्ट्रवादीने रावेर लाेकसभेसाठी पुन्हा तयारी सुरू केली अाहे. गेल्या पंधरवड्यात जिल्हा दाैऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दाेन्ही मतदारसंघांची माहिती घेतली हाेती. इच्छुकांची चाचपणी करताना रावेरात काँग्रेसमधून उमेदवार अायात करण्याची तयारी त्यांनी दर्शविली हाेती. 
   २ शिवसेनेत गेलेले माजी अामदार संताेष चाैधरी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये परतले अाहेत. रावेरमध्ये संताेष चाैधरींसह जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, माजी अामदार मनीष जैन यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून पुढे अाली अाहेत. त्यामुळे रावेरसंदर्भातील राष्ट्रवादीचा विचार पक्का झाला अाहे. शनिवारी मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत राष्ट्रवादी कांॅग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रावेर मतदारसंघाची मागणी लावून धरली हाेती. 
   ३ रावेर लाेकसभा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादीकडे असल्याने ताे साेडू नये, अशीच मागणी त्यांनी केली. त्यामुळे दाेन्ही पक्षांकडून रावेर लाेकसभा मतदारसंघासाठी रस्सीखेच सुरू झाली अाहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी काँग्रेसने पुणे लाेकसभा मतदारसंघ साेडावा, अशी मागणी हाेत असताना पुण्यासाेबतच रावेर लाेकसभा मतदारसंघ देखील सध्या दाेन्ही पक्षांसाठी चर्चेचा विषय ठरला अाहे.

   रावेर काँग्रेसकडेच जळगावही घेऊ 
   रावेर लोकसभा मतदार संघात काॅंग्रेसचे प्राबल्य अाहे. या मतदार संघात दाेन्ही वेळा राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झालेले अाहेत. हा मतदार संघ काॅंग्रेसलाच मिळेल, हे निश्चित. साेबत जळगाव लाेकसभा मतदार संघाची देखील अाम्ही मागणी केली असून हा मतदार संघ देखील काॅंग्रेसला मिळू शकताे. जन संघर्ष यात्रेत अामच्या वरिष्ठ नेत्यांशी याबाबत चर्चा झालेली अाहे. त्यांनी तसे संकेत देखील दिले अाहेत. 
   -अॅड. संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

Post a Comment

Top