0
वॉशिंग्टन - अमेरिकेतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एक पती आपल्या पत्नीला त्याच्या पाळीव डॉगीसोबत घरात एकटाच सोडून गेला होता. जेव्हा तो बाजारातून सामान खरेदी करून परतला तेव्हा घरातले दृश्य पाहून त्याला धक्काच बसला.

कुत्र्याला खूप जीव लावायचे कपल
ही हैराण करणारी घटना वॉशिंग्टन डीसीची आहे. रॉबर्ट फ्रेजर येथे पत्नी एंजेलासोबत राहायचे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी एंजेलाशी लग्न केले. परंतु त्यांचा डॉगी केनला त्यांनी 8 वर्षांपूर्वी घेतले होते.
डॉगीला पत्नीसोबत एकटे सोडून गेला पती
त्यांनी केनला स्वत: ट्रेनिंग दिली होती. तो नेहमी चांगले वागायचा. एंजेलाशीही त्याची चांगली बाँडिंग जमली होती. परंतु, एका दिवशी रॉबर्ट बाजारातून काही सामान खरेदी करण्यासाठी एंजेला आणि केनला एकटे सोडून गेले. काही वेळाने ते परतले तेव्हा घरातील दृश्य पाहून भयचकित झाले.
जमिनीवर रक्तबंबाळ पडलेली होती पत्नी, डॉगी तोडत होता लचके
रॉबर्टने पाहिले की, एंजेला रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडलेली आहे. केन तिचे लचके तोडत आहे. आधी तर रॉबर्टला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना, कारण केन यापूर्वी कधीच एवढा आक्रमक नव्हता. रॉबर्टने ताबडतोब अॅम्ब्युलेन्स आणि पोलिसांना कॉल केला.
हॉस्पिटलमध्ये पोहोचताच एंजेलाचा झाला मृत्यू
कॉल केल्यानंतर पोलिस आणि मेडिकल टीम रॉबर्ट घरी पोहोचली. त्यांनी एंजेलाला केनच्या तावडीतून सोडवले. यादरम्यान मेडिकल टीमच्या एका सदस्यावरही डॉगीने हल्ला चढवला. खूप प्रयत्न केल्यानंतर डॉगीवर नियंत्रण मिळवता आले. यानंतर एंजेलाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु तेथे गेल्यावर डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले
.

बाजारातून 15 मिनिटांत घरी परतला पती, पत्नीची अवस्था पाहून बसला शॉक

  • Husband Shocked To See Her Wife Mauled To Death By Own Dog In Washington DC

Post a Comment

 
Top