0
  • Other MPs have do not give chance again, Except Supriya Suleमुंबई- लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससोबत जागावाटपाची चर्चा करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. मागील दोन दिवसांपासून मुंबईतील पक्ष मुख्यालयात पक्षाची ताकद असलेले मतदारसंघ, तेथील राजकीय सद्य:स्थिती, इच्छुक उमेदवार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची मते पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जाणून घेतली. या वेळी पक्षाच्या विद्यमान चार खासदारांपैकी सुप्रिया सुळे वगळता अन्य तिघांना पुन्हा संधी देण्यास स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांकडून विराेध करण्यात अाला. तसेच अाघाडी झाल्यास काँग्रेससोबत काही मतदारसंघांची अदलाबदल करण्याचे संकेत मिळत आहेत.
    Advertisement


    प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, अाघाडी करण्यापूर्वी आमची ताकद असलेल्या मतदारसंघांचा आढावा या बैठकांत घेण्यात आला. शिवाय संभाव्य उमेदवार काेण असतील, याचीही चाचपणी करण्यात आली. अद्याप ही चर्चा प्राथमिक स्तरावर असून वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. आम्ही कोणत्या जागा लढवणार हा या चर्चेचा मुख्य उद्देश नव्हता, असे सांगताना काही जागांवर मित्रपक्षासोबत अदलाबदलीचे संकेत त्यांनी दिले. त्यानुसार, यवतमाळ, पुणे, हातकणंगले अशा राष्ट्रवादीकडे नसलेल्या मतदारसंघांचाही आढावाही बैठकीत घेण्यात आल्याचे समजते.

    उदयनराजे पुन्हा चर्चेत...
    नेहमीप्रमाणे पक्षाच्या बैठकीत उदयनराजे चर्चेत केंद्रस्थानी होते. साताराची अाढावा बैठक संपल्यानंतर ते पक्ष कार्यालयात पोहोचले. नवीन कार्यालय अापणास ठाऊक नसल्याची सबबही त्यांनी यासाठी दिली. बैठकीनंतर त्यांनी शरद पवारांशी स्वतंत्र चर्चा करून साताऱ्यात अापणच लढणार असल्याचे सांगितले. २-३ लोक विरोध करतात म्हणून तिकीट देणार नाही, अशी भूमिका योग्य नसल्याचेही भाेसले म्हणाले.

    मनसेबाबत चर्चा नाही : पाटील
    मनसेला आघाडीत घेण्याबाबत अाम्ही चर्चा केलेली नाही. आमच्या समविचारी पक्षांच्या व्याख्येमध्ये जे पक्ष बसतील त्यांच्याशी आम्ही चर्चा करत आहोत, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. मात्र विरोधी गटांतील सर्व पक्षांना घेऊन एक सक्षम असा पर्याय लोकसभेत देऊ, असाही त्यांनी दावा केला.

    मोहिते पाटील, महाडिक, उदयनराजे अडचणीत
    राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदारांना पुन्हा संधी द्यावी किंवा नाही, अशी विचारणाही स्थानिक पदाधिकाऱ्यांना करण्यात आली. या वेळी सुप्रिया सुळे वगळता उदयनराजे भोसले, विजयसिंह मोहिते पाटील आणि धनंजय महाडिक या ३ विद्यमान खासदारांच्या विरोधात सूर उमटला. साताऱ्यात रामराजे निंबाळकर, तर माढ्यातून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख व कोल्हापुरातून धनंजय महाडिक यांच्याऐवजी नव्या चेहऱ्याला संधी देण्याची मागणी स्थानिक नेत्यांनी केली.

Post a Comment

 
Top