राज्यात अवर्षण झाले आहे. सरासरीच्या केवळ ७७ टक्के पाऊस राज्यात झाला आहे. त्यामुळे १८० तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या तालुक्यांत शेतीशी निगडीत ज्या काही समस्या आहेत त्या हाताळल्या जातील. ज्यांच्या पिकांचे नुकसान झाले. त्यांना विम्याची रक्कम मिळणार आहे. त्याचबरोबर दुष्काळी भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा, वीज पंप सवलत, चारा छावण्या आदी उपाययोजना केल्या जातील. टंचाईग्रस्त भागात वीज जोडणी खंडित केली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. राज्यातील दुष्काळस्थितीची केंद्रीय पथक पाहणी करणार आहे. त्यानंतर केंद्राकडून राज्याला मदत मिळेल, असेही ते म्हणाले.
कर्नाटकपेक्षा जास्त उपाययोजना महाराष्ट्राकडून...
दुष्काळ स्थितीबाबत कर्नाटकपेक्षा महाराष्ट्राने अधिक उपाययोजना केल्या आहेत, असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे. जलयुक्त शिवार योजनेबाबत काँग्रेस, राष्ट्रवादीकडून होत असलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांना विरोधकांवर निशाणा साधला आहे. जलयुक्त शिवार योजना त्यांना कळलेली नाही. या योजनेबाबत आरोप करणे म्हणजे घाम गाळून जलयुक्त करणाऱ्या लोकांचा हा अपमान आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Post a Comment