0
लखनऊ -सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त जमिनीची सुनावणी जानेवारीपर्यंत टाळली आहे. त्यानंतर राजकीय वक्तव्ये आणि मतमतांतरे मांडण्यास सुरुवात झाली आहे. राम मंदिरासाठी अध्यादेश आणण्याची मागणी भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने लावून धरली जात आहे. हा मुद्दा सोडवण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लवकरात लवकर या प्रकरणाचा निपटारा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


न्यायदानात विलंब झाल्यास लोकांत निराशा येते. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. परंतु देशात शांतता व सौहार्दासाठी व्यापक आस्थेचा सन्मान करून इतर पर्यायांवर विचार व्हायला हवा, असे आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

मंदिराबाबतच्या विलंबावरून संतांमध्ये असलेल्या नाराजीवर आदित्यनाथ म्हणाले, हा संक्रमण काळ आहे. अशावेळी संतांनी धैर्य राखणे गरजेचे आहे. अर्थात या प्रकरणात शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यात यावा. सर्वांच्या संमतीने त्यावर मार्ग काढण्यात यावा. अन्यथा आमच्याकडे अन्य काही पर्यायदेखील आहेत, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी सांगितले.
२०१९ च्या विजयासाठी योगी १७ नोव्हेंबरला चालवतील दुचाकी, भाजप नेत्यांची विधानसभेच्या ४०३ मतदारसंघांतील गावांत पदयात्रा
भाजपने लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश जिंकण्याची महायोजना आखली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दुचाकी रॅली, तर पक्षाचे उर्वरित नेते राज्यभरात गावागावांतून पदयात्रा काढणार आहेत. संघ आणि भाजपच्या अलीकडे झालेल्या बैठकीचा परिणाम राज्यात दिसू लागला आहे. १७ नाेव्हेंबरपासून ८० लोकसभा मतदारसंघांत बाइक रॅली, तर महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीपासून १५ डिसेंबरपर्यंत कार्यकर्ते राज्यातील ४०३ विधानसभा मतदारसंघांतील गावागावात पदयात्रा काढणार आहेत. त्यात पक्षाचे नेते सहभागी होतील.
विश्व हिंदू परिषदेने केली कायदा बनवण्याची मागणी
सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विश्व हिंदू परिषदेने अयोध्येतील राम मंदिरासाठी कायदा तयार करण्याची मागणी केली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारने अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी अध्यादेश आणण्यावर गांभीर्याने विचार करायला हवा, असे विहिंपने म्हटले आहे. संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार म्हणाले, आम्ही सर्व खासदारांना जाऊन भेटणार आहोत. त्यांना निवडून देणाऱ्या मतदारांना अयोध्येत मंदिर पाहण्याची इच्छा आहे, असे आम्ही खासदारांना समजावून सांगणार आहोत. सध्या या मुद्द्याला पाठिंबा देण्यास देशातील बहुधा सर्वच पक्ष तयार असावेत.
भाजपला कायदा करण्याची इच्छा असल्यास करावा, आम्ही रोखलेले नाही : कपिल सिब्बल
काँ ग्रेसचे नेते कपिल सिब्बल म्हणाले, अयोध्या प्रकरणाची सुनावणी कधी घेतली जावी, याचा निर्णय न्यायालय घेईल. पण ते कायदा आणू इच्छित असल्यास आम्ही त्यांना रोखलेले नाही. निवडणुकीमुळे हा मुद्दा पुढे आला आहे. चार वर्षे ते झोपले होते का?
याकूब मेमनसाठी रात्री १२ वाजता कोर्ट सुरू होते, मंदिरासाठी तारीख पे तारीख : अनिल विज 
हरियाणाचे मंत्री अनिल विज म्हणाले, सर्वोच्च न्यायालय महाPeople should be reluctant to think about alternative delays, Yogiन आहे. याकूब मेमनसाठी रात्री १२ वाजता कोर्ट सुरू होते. ही सुप्रीम कोर्टाची मर्जी. मंदिराच्या प्रकरणाकडे लोकांचे लक्ष लागलेले आहे. त्यावर मात्र तारीख पे तारीख.

Post a Comment

 
Top