0
सातारा :  प्रतापसिंहनगर झोपडपट्टीत दोन गटांत राडा, तलवार, चाकूच्या हल्ल्यात नऊ जण जखमीप्रतापसिंहनगर झोपडपट्टीमध्ये मोकळ््या जागेत शेड बांधल्याच्या कारणावरून दोन गटांत रविवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास राडा झाला. यात एकमेकांवर तलवार व चाकूने हल्ला केल्याने नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात परस्पराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा : प्रतापसिंहनगर झोपडपट्टीमध्ये मोकळ््या जागेत शेड बांधल्याच्या कारणावरून दोन गटांत रविवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास राडा झाला. यात एकमेकांवर तलवार व चाकूने हल्ला केल्याने नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात परस्पराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मीना सुदाम क्षीरसागर (वय ४०, रा. प्रतापसिंहनगर) यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, मीना क्षीरसागर यांनी मोकळ््या जागेत शेड बांधले होते. त्यांच्या घराशेजारी राहणारा विशाल अंगद मोरे हा वारंवार शिवीगाळ करत होता. त्यास जाब विचारण्यासाठी गेलेल्या मीना यांच्यावर विशालने तलवारीने वार केला.त्यावेळी मीना यांच्या कुटुंबातील जवाहर गायकवाड, सुनील सुबराव गायकवाड, सुरेश गायकवाड, सुदाम क्षीरसागर, लता पोडमल, मैना गायकवाड धावत आले. ते सर्वजण भांडणे सोडत असताना त्यांना मीना अंकुश मोरे, बेवा ऊर्फ राजू मंडलिक, अर्चना विशाल मोरे, सोनम राजू मंडलिक, अंगद मोरे यांनी दगड, लोखंडी गजाने मारहाण केली. यात मीना क्षीरसागर यांच्यासह कुटुंबातील आठजण जखमी झाले. तसेच मीना यांच्या गळ््यातील सोन्याचे डोरले गहाळ झाले.अर्चना विशाल मोरे (वय २०, रा. प्रतापसिंह नगर) यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, मीना क्षीरसागर यांनी बांधलेल्या शेडसमोर कचरा टाकल्याच्या कारणावरून मीना हिने शिवीगाळ केली. यावेळी झालेल्या भांडणात अर्चना यांच्या डोक्यात मैना जवाहर गायकवाड हिने लाकडी दांडक्याने मारहाण केली. जवाहर गायकवाड, सुनील सुबराव गायकवाड, सुरेश गायकवाड, सुदाम क्षीरसागर, लता पोडमल यांनी लोखंडी गज व चाकूने वार केले. यात अर्चना जखमी झाल्या आहेत. तसेच त्यांच्या गळ््यातील मंगळसूत्र गहाळ झाले आहे. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात परस्पराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक फौजदार विष्णू खुडे करीत आहेत.Satara: Nine people injured in Rada, Talwar and knife attack in Pratap Singh Nagar slum area | सातारा :  प्रतापसिंहनगर झोपडपट्टीत दोन गटांत राडा, तलवार, चाकूच्या हल्ल्यात नऊ जण जखमी

Post a Comment

 
Top