0
हरदा (एमपी) - शुक्रवारी रात्री झालेल्या पोस्ट ऑफिस कलेक्शन एजंटची हत्या त्याच्याच पत्नीच्या प्रियकराने केल्याचे समोर आले आहे. पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या संबंधांची माहिती मृत पतीला मिळाली होती. प्रियकर त्याच्यावर घटस्फोटासाठी दबाव टाकत होता. त्याने दिला नाही म्हणून आरोपीने आपल्या मित्रांसोबत मिळून त्याची हत्या केली. दिशाभूल केल्याबद्दल पोलिसांनी पत्नीलाही अटक केली आहे. या खळबळजनक हत्याकांडाचा खुलासा करताना ही माहिती रविवारी एसपी राजेश कुमार सिंह यांनी दिली. पोलिसांनी मुख्य आरोपीसहित आणखी एकालाही जेरबंद केले आहे. तथापि, आणखी दोन आरोपी फरार आहेत.
 • पत्नीचे 2 वर्षांपासून होते अवैध संबंध
  - पोस्ट ऑफिस कलेक्शन एजंटच्या हत्येच्या आरोपावरून पोलिसांनी मृत राजेश चौहानची पत्नी मनीषा आणि तिचा प्रियकर प्रकाश (26) यांना देवास जिल्ह्यातून अटक केली आहे.
  - आरोपी प्रकाशचे मृताच्या पत्नीशी 2 वर्षांपासून अवैध संबंध होते. यावरून पती-पत्नीत दररोज भांडणे होत होती. घटस्फोट आणि संपत्तीतील अर्धा हिस्सा घेऊन तो विकण्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद वाढू लागला होता. यात प्रकाशने त्याच्या 3 मित्रांसोबत मिळून राजेशची हत्या केली.
  - विशेष म्हणजे आरोपी व इतर तिघे घटनेच्या आधी एका ढाब्यावर भेटले. मग प्रकाश राजेशच्या घरी गेला. येथे त्याने घरातील मनीषा व तिच्या दोन्ही मुलांना आधी घराबाहेर काढले. मग हत्या केली.
  - 3 आरोपी अजूनही फरार आहेत. प्रकाशला 22 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. मनीषाला कोर्टाने तुरुंगात पाठवले आहे. एसपी राजेश कुमार सिंह यांनी अटक होईपर्यंत इतर तिघांची नावे जाहीर करणार नाहीत असे सांगितले आहे.
  - एसपी म्हणाले- आरोपींनी मनीषा व घरात उपस्थित असलेल्या मुलांना बाहेर काढले. मग हत्या केली. मनीषाने खुनाची माहिती सर्वात आधी आपल्या दिराला दिली. परंतु हत्या करणाऱ्याबाबत काहीही सांगितले नाही. पोलिसांचीही दिशाभूल केली. एसपी म्हणाले- या मर्डरमध्ये सर्वांचा सारखाच सहभाग आहे. यामुळेच मनीषालाही आरोपी बनवण्यात आले आहे.
  - हत्येच्या आधी व घटनेच्या दिवशी आरोपी व मनीषाचे मोबाइलवर 10 ते 15 वेळा बोलणे झाले. कॉल डिटेल्समध्ये याला दुजोरा मिळाला आहे. यात प्रत्यक्षदर्शी कोणीही नव्हते. यामुळे पोलिस अवैध संबंध व मृतावर असलेले कर्ज या मुद्द्यांवर चौकशी करत आहेत.
  - प्रकाशने हत्येनंतर रक्ताने माखलेले हत्यार सरकारी सरकारी शाळेजवळ लपवले. त्याचे बूट जप्त केले, ज्यावर रक्ताचे डाग होते. तसेच रक्ताचे डाग असलेले शर्ट घरातून जप्त करण्यात आले आहे. हत्येदरम्यान वापरलेले वाहन पल्सर (एमपी 47 एमसी 5842) सुद्धा जप्त करण्यात आली आहे.
  संपत्ती अन् घटस्फोट ठरले हत्येचे कारण
  - एसपी म्हणाले- राजेश व मनीषाचे लग्न 10 वर्षांपूर्वी झाले होते. 9 वर्षांची मुलगी व 6 वर्षांचा मुलगा आहे. मृताचेही 5 वर्षांपूर्वी दुसऱ्या महिलेशी अवैध संबंध होते. यामुळे मनीषा व्यथित होती. राजेशचे घरातच छोटे किराणा दुकान होते. त्यावर मनीषाही बसायची.
  - या दुकानावर प्रकाशचे येणे-जाणे होते. 2 वर्षांपूर्वी प्रकाशशी तिची जवळीक वाढली. प्रकाशलाही एक अपत्य आहे. मनीषा आणि प्रकाशच्या अवैध संबंधांची बाब राजेशला कळली होती.
  - दररोज यावरून पती-पत्नीत भांडणे होत होती. एसपींच्या मते, राजेश व मनीषामध्ये अनेकदा यावरून घटस्फोटापर्यंत बोलणे झाले होते. परंतु मनीषाला त्याआधी संपत्तीतला आपला हिस्सा विकायचा होता. दोघांच्या नावावर तब्बल 70 लाख रुपयांची संपत्ती होती. परंतु राजेश कधी हो म्हणायचा, कधी नकार द्यायचा. घटस्फोटही देत नव्हता. प्रकाशही घटस्फोटासाठी मनीषा व राजेशवर दबाव टाकत होता. त्या रात्री प्रकाश याबद्दलच राजेशशी बोलायला गेला होता. यादरम्यान वाद वाढत गेला. मग त्याने आपल्या मित्रांना बोलावून राजेशची हत्या केली.

  पतीवर घटस्फोटासाठी दबाव टाकत होता प्रियकर, दिला नाही म्हणून केले असे काही

  • Wife And Husband Both Have Lethal Affair But Wifes Lover Killed Hubby In UP

Post a Comment

 
Top