0
 • Tv Actor Arrested in Murder Case in Kanpurकानपूर- गंगेच्या कालव्यात प्लास्टिकच्या पोत्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. अक्षय उर्फ निक्कीचा हा मृतदेह होता. अक्षयच्या मित्रानेच त्याची निर्घृण हत्या केली. हा प्री-प्लान्ड मर्डर असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे व्हिडिओ कॉलवरून दोन मित्रांमध्ये झालेल्या वादातून ही हत्या करण्‍यात आल्याचे समोर आले आहे. आरोपीने अक्षयचा जीव निघेपर्यंत त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले होते. या हत्येप्रकरणी पोलिसांनी टीव्ही अॅक्टरसह तिघांना अटक केली आहे.

  मिळालेली माहिती अशी की, फजलगंज पोलिस स्टेशनच्या हद्दीतील दर्शनपूर्वा येथे राहाणारा अक्षय पिज्झा डिलिव्हरीचे काम करत होता. त्याचा बेस्ट फ्रेंड आकाश साहू याचे अलाहाबाद येथील एका तरुणीसोबत अफेअर सुरु होते. दोघे तासंतास मोबाइलवर बोलत होते. मात्र, मा‍गील काही दिवसांपासून अक्षयच्या संपर्कात आली होती. तरुणी ही आकाशची गर्लफ्रेंड असल्याची माहिती अक्षयला नव्हती. एके दिवशी तरुणीने आकाशसमोरच अक्षयला व्हिडिओ कॉल केला होता. कॉलवर अक्षय दिसताच आकाश प्रचंड संतापला होता. आपल्या प्रेमात अडथळा ठरत असलेल्या अक्षयला आकाशने संपविण्याचा कट रचला.
  आकाश असा अडकला जाळ्यात..
  अक्षय बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांत दिली होती. हत्याकांडचा तपास करणार्‍या पोलिसांनी अक्षयच्या मोबाइल क्रमांकाचे सीडीआर काढले.
  मोबाइल क्रमांक पाहिले असता पोलिसांना आकाशवर संशय बळावला. पोलिसांनी आकाशला चौकशीसाठी बोलावले. पोलिसी खाक्या पाहाताच आकाशने गुन्हा कबूल केला. त्याने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला.
  दारुत दिल्या झोपेच्या गोळ्या...
  - आकाशने पोलिसांना सांगितले की, तो 23 सप्टेंबरला रात्री स्कूटीने अक्षयच्या घरी गेला. दारू पार्टी करू, असे सांगून अाकाशने अक्षयला आपल्या घरी आणले. तिथे आधीच आकाशचा मित्र मुन्ना उपस्थित होता.
  - आकाशने अक्षयच्या दारुत आधीच झोपेच्या गोळ्या टाकल्या होत्या. अक्षयने शुद्ध हरपल्यानंतर आकाश आणि मुन्नाने त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले. नंतर आकाशने अक्षयचा गळा आवळला.
  - नंतर मुन्ना आणि आकाशने अक्षयचे पाय त्याच्या गळ्याला बांधले. त्याची ओळख लपविण्यासाठी त्याला‍ विवस्र केले. प्लास्टिकच्या पोत्यात बांधून नंतर आकाशने टीव्ही अॅक्टर अनुभव जयस्वाल याला कार घेऊन बोलावले. नंतर तिघांनी कारच्या डिक्कीत अक्षयचा मृतदेह ठेवून गंगेच्या कालव्यात फेकून दिले
  .

Post a Comment

 
Top