0
 • जळगाव- 'महात्मा गांधी हे कधीच काँग्रेसचे नव्हते, ते त्यांची मक्तेदारीदेखील नाही. गांधीजी अापल्याच म्हणजे भाजप विचारांचे हाेते. त्यांनी स्वातंत्र्यानंतर काँग्रेस बरखास्त करण्याच्या सूचना दिल्या हाेत्या. मात्र या अादेशाचे पालन करण्याएेवजी काँग्रेसने त्यांच्या नावाचा फक्त राजकीय वापर केला,' असा अाराेप जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी पक्षाच्या संघटनात्मक बैठकीत केला.


  भाजपने गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त 'जयंती ते पुण्यतिथी'असा कार्यक्रम तयार केला अाहे. यानिमित्त भाजप प्रत्येक तालुक्यात गांधी पदयात्रा काढणार अाहे. या पदयात्रेसंदर्भात बाेलताना महाजन यांनी गांधीजींविषयी भूमिका मांडली. ते म्हणाले, 'गांधीजींना अपेक्षित विचारांनुसार काँग्रेस नव्हे तर भाजप चालत अाहे. किंबहुना गांधीजी हे भाजपच्याच विचारांचे हाेते,' असा दावाही करून त्यांनी कार्यकर्त्यांना 'रामनामाचा जप करा अाणि बापूंच्या मार्गावर चाला' असे अावाहनही केले.

  माेदींबाबत बाेलायला पवारांची जीभ वळत नाही 
  देशात सारे काही गांधींच्या मार्गावर सुरू अाहे. माेदींची प्रशासनावर पकड अाहे. त्यांच्याबाबत कुणी बाेलू शकत नाही. शरद पवारांचीही जीभ त्यांच्याबाबत बाेलण्यास वळू शकत नाही. रफालवर बाेलताना सुरुवातीला त्यांनी माेदींच्या बाजूने मत मांडले. मात्र नंतर त्यांच्या पक्षाच्या खासदारांनी राजीनामा दिल्याने पक्ष वाचवण्याची धडपड म्हणून त्यांनी स्पष्टीकरण दिले, असे गिरीश महाजन म्हणाले.
  मटन, मांसाहार करु नका...
  ‘वैष्णव जन तो....’ हे गीत पाठ करून प्रत्येक तालुक्यात पदयात्रा काढण्याची सूचना यावेळी कार्यकर्त्यांना करण्यात आली तसेच यात्रेदरम्यान कुठेही मटन, मांसाहाराचा पाहुणचार घेऊ नका, असा ‘गांधीगिरी’चा सल्ला जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी दिला.

Post a Comment

 
Top