0
  • माजलगाव- मुलीचा पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाल्यानंतर तिला आलेली मालमत्ता व पैसा लाटून दुसऱ्याशी लग्न लावून दिले. दुसऱ्या पतीच्या नातेवाइकांशी संगनमत करून जन्मदात्या पित्यानेच मुलीला वेश्या व्यवसायात लोटले. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पित्यासह अकरा जणांविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.


    तालुक्यातील गोविंदवाडी येथील तरुणीचा पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाल्यानंतर तिला सासरकडून मिळालेला प्लॉट व पैसा अशी मालमत्ता तिच्या पित्याने स्वतः लाटून हडप केली. त्यानंतर गावातील एका व्यक्तीने तरुणीच्या पित्याच्या मदतीने गावातीलच एका व्यक्तीसोबत तिचा दुसरा विवाह लावून दिला. विवाहानंतर तिचा पती कायम तिला शारीरिक व मानसिक छळ करत राहिला. तिला विष पाजण्याचाही प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर बीड येथील सरकारी दवाखान्यात तिच्या मनाविरुद्द गर्भपातही घडवून आणला.

    पीडित महिलेस एकटी असल्याचा गैरफायदा घेत आणखी एका व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला. तसेच इतर दोघांनीही तिच्यावर संगनमत करत सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर पीडितेला जामखेड येथील कला केंद्रावर नेऊन तिला वेश्या व्यवसायात करण्यास भाग पाडले. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात पीडितेच्या तक्रारीवरून तिच्या वडिलांसह अकरा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक मिर्झा बेग हे करत आहेत.

Post a Comment

 
Top