0
यावलअल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी पोलिस कोठडी मिळालेला आरोपी यावल पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाल्याचे समोर आले आहे. ही घटना मंगळवारी रात्री जळगाव येथे जिल्हा रुग्णालय प‍रिसरात घडली. मुकुंदा विलास सपकाळे (वय-22, रा.वड्री, ता.यावल) असे आरोपीचे नाव आहे.

वड्री येथील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचा तसेच तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला मंगळवारी अटक केली होती.
यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी नसल्याने आरोपीला वैद्यकिय तपासणीसाठी जळगाव येथे नेण्‍यात आले होते. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

काय आहे प्रकरण?
वड्री (ता. यावल) येथील पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरोधात यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्‍यात आला होता. आरोपीने 20 ऑक्टोंबरला पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. आरोपी पीडितेला घेऊन आधी पैठण (जि.औरंगाबाद) येथे गेला होता. नंतर तेथून तो नाशिक येथे एका हॉटेलात पीडितेसोबत थांबला. हॉटेलमध्ये त्याने पीडितेचे लैंगिक शोषण केले. 22 ऑक्टोबरला रात्री दोघांना पीडितेच्या नातेवाईकांनी ताब्यात घेतले. आरोपीला यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
26 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी
आरोपीला भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता कोर्टाने त्याला 26 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडी मिळाल्यावर संशयीताची पोलिसांना वैद्यकीय तपासणी आवश्यक होती. त्यानुसार पोलिस उपनिरिक्षक दीपक ढोमणे, हवालदार नेताजी वंजारी हे दोघांनी आरोपीला जळगाव जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता तो तेथून पसार झाला. यासंदर्भात नेताजी वंजारी यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल रूग्णालयाचा प्रश्न ऐरणीवर..
यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारीअभावी नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच पोलिसांचीही मोठी गैरसोय होत आहे. कुठल्याही आरोपीस अटक केल्यावर त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी अडचणी येत आहेत.
गुन्ह्याच्या कलमात वाढ ?Minor girl kidnap in Yawal Jalgaon
पीडितेच्या नातेवाईकांच्या तक्रारीनुसार, अल्पवयीन पीडितेसोबत आरोपीने नाशिक येथे शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानुसार पीडित मुलीला जळगाव जिल्हा रुग्णालयात वैद्यकिय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर आरोपीच्या गुन्ह्याच्या कलमात आणखी वाढ होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Post a Comment

 
Top