0
नवी दिल्ली - दिल्ली कैंटमध्ये सैन्यातील मेजरवर त्यांच्या मोलकरणीनेच बलात्कार, मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना जुलै महिन्यातील आहे, आणि गुन्हा सप्टेंबरमध्ये दाखल झाला आहे. पीडितेनेच तक्रारीत याचा उल्लेख केला आहे. पीडिता म्हणाली की, ती गरीब आहे आणि आरोपी श्रीमंत, म्हणून कोणीच दखल घेत नव्हते. सुरुवातीपासूनच पोलिस प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत होते. याबाबत डीसीपी देवेंद्र आर्य यांना पोलिसांची बाजू जाणून घेण्यासाठी अनेक वेळा कॉल करण्यात आला, परंतु उत्तर मिळाले नाही.

पीडितेने सांगितली आपबीती... मेजरचे कृत्य पतीने पाहिले, विरोध केल्यावर बेदम मारायचा

संबल (यूपी) ची रहिवासी पीडिता म्हणाली की, ती आणि पती हे अर्जुन विहार, दिल्ली कैंटमधील मेजरच्या बंगल्यात 3 महिन्यांपासून काम करत होते. कुटुंब सर्व्हंट क्वार्टरमध्ये राहायचे. 12 जुलैच्या रात्री 10 वाजता मेजरने पतीला फ्रीज विकण्यासाठी पाठवले. मेजरची नियत खराब होती. त्याने मला रूममध्ये यायला सांगितले. मी नकार दिल्यावर मारले आणि बळजबरी रूममध्ये ओढून नेले. जेव्हा पती परत आले तेव्हा त्यांनी मेजरचे हे कृत्य पाहिले. विरोध केल्यावर मेजरने मारहाण केली आणि धमकी दिली की, एकही शब्द बोललास तर गोळी घालीन.

मेजरने पतीच्या हत्येला सुसाइड सांगितले 
महिलेने सांगितले 'मेजरने मलाही बेदम मारले होते, मी बेशुद्ध झाले. तत्पूर्वी त्याने पतीला तेथून पळवून लावले. जेव्हा शुद्ध आली तेव्हा मेजर बसलेला होता आणि धमकी देत होता. तेथून निघून मी जवळच नणंदेच्या घरी गेले. त्याच दिवशी रात्री 12.30 वाजता मेजर तेथे आला आणि म्हणाला की, माझ्या पतीने आत्महत्या केली आहे. माझे पती सुसाइड करू शकत नाहीत, त्यांची हत्याच झाली आहे.'

पीडिता म्हणाली- मेजरची नियत खराब होती, रूममध्ये बोलवायचा; विरोध केल्यावर मारायचा

  • army major Tampered with med threatened and beaten

Post a Comment

 
Top