0
भारतीय चित्रपटसृष्टीत शोमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचे सोमवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास निधन झाले. हृदयविकारामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 88 वर्षांच्या होत्या.
कृष्णा यांच्या पश्चात रणधीर, ऋषी, राजीव कपूर ही मुले तर रितू नंदा आणि रिमी जैन या दोन मुली, जावई, नातवंडे, नातजावई, पतवंडे असा परिवार आहे. राज कपूर यांनी 1946 मध्ये कृष्णा यांच्याशी विवाह केला होता. 1988 मध्ये राज कपूर यांच्या निधनानंतर त्यांनी संपूर्ण कुटुंबाला एकत्र जोडून ठेवले. आपल्या पाचही मुलांची जबाबदारी स्वीकारली. कृष्णा यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीत शोकाकूळ वातावरण असून अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कृष्णा राज कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या निधनाने कपूर घराण्याचा आधारस्तंभ निखळल्याची 
 भावना व्यक्त होत आहे.आजी कृष्णा राज कपूर यांचे आज पहाटे निधन झाले.

  • Raj Kapoor wife Krishna Kapoor passes away

Post a comment

 
Top