स्पोर्ट्स डेस्क - इंडोनेशियात पार पडलेल्या 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंतची सर्वोत्कृष्ठ कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी यात एकूण 15 गोल्ड, 24 सिलव्हर आणि 30 ब्रॉन्झ मेडल जिंकले आहेत. परतलेल्या खेळाडूंचे भारतात जंगी स्वागतही करण्यात आले. परंतु, अवघ्या दोन दिवसांत सरकार आणि नागरिकांना त्या खेळाडूंचा विसर पडला. असाच एक खेळाडू हरीश कुमारने Asian Games मध्ये सेपकटकरा क्रीडा प्रकारात ब्रॉन्झ मेडल मिळवले. परंतु, इंडोनेशियाहून दिल्लीत परतल्याच्या अवघ्या दोन दिवसांनंतर तो आपल्या वडिलांच्या चहाच्या दुकानावर बसला. आणि पुन्हा चहा विकण्यास सुरुवात केली.
काय म्हणाला हरीश?
हरीशने सांगितल्याप्रमाणे, "वडील चहाचे दुकान चालवतात. हेच दुकान आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. आमचे कुटुंब खूप मोठे आहे. त्यात दोन बहिणी दृष्टीहीन आहेत. वडिलांना माझ्या मदतीची खूप गरज आहे.त्यामुळे, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतून परतल्यानंतर मी चहा विकतो. माझ्या मदतीने थोडीशी जास्त कमाई झाली तरीही आमच्या कुटुंबियांसाठी खूप मोठा आधार होईल."
विमानतळावरून ढकलत आणली बस
एशियाडमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकल्यानंतर सेपकटकरा टीम शुक्रवारी भारतात परतली. दिल्लीच्या या खेळाडूंचे पथक विमानतळावर पोहोचले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी दिल्ली सरकारकडून कुणीही पोहोचले नव्हते. एवढेच नव्हे, तर विमानतळावरून नेण्यासाठी त्यांच्यासाठी जी बस होती ती सुद्धा सुरू झाली नाही. त्यामुळे, याच खेळाडूंना खाली उतरून धक्का द्यावा लागला. ही बस सुद्धा लोकांनी वर्गणीतून गोळा करून आणली होती. त्याची व्यवस्था कॉलनीतील रहिवाशींनीच केली होती.काय असतो सेपकटकरा?
सेपक टकरा भारताच्या नॉर्थ ईस्टमध्ये प्रसिद्ध क्रीडा प्रकार आहे. हे खेळ व्हॉलीबॉल, फुटबॉल आणि जिम्नॅस्टिकचे मिश्रण आहे. हा खेळ इंडोअर खेळला जातो. यात 20 बाय 44 आकाराच्या हॉलमध्ये सिंथेटिक फायबरचा चेंडू असतो. हा खेळ दोन प्रकारे खेळला जातो. पहिल्या इव्हेंटमध्ये 15 खेळाडू असतात. दुसऱ्या रेगू इव्हेंटमध्ये 5 खेळाडू सहभागी असतात. एशियन गेम्समध्ये या क्रीडा प्रकारात भारत 2006 पासून सहभागी होत आहे. परंतु, मेडल मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment