0
 ही सध्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. या मालिकेतील तिची भूमिका, तिचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. आज अनिता प्रेक्षकांची प्रचंड लाडकी बनली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यानंतर ती हलकं फुलकं या नाटकात सागर कारंडेसोबत झळकली होती. एवढेच नव्हे तर राणी मुखर्जीच्या अय्या या चित्रपटात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती.

अनिता ही मुळची नाशिकची असून तिचे बालपण, शिक्षण नाशिकमध्ये झाले आहे. तिचे काका उपेंद्र दाते हे रंगभूमीवर प्रचंड प्रसिद्ध आहेत. नाशिकच्या कन्या विद्यालयात तिचे शिक्षण झालेले आहे. त्यानंतर ती पुढील शिक्षणासाठी पुण्यात गेली. पुण्याच्या ललित कला केंद्रातून तिने पदवी घेतली आहे. अनिताला लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने ती शाळेत आणि कॉलेजमध्ये नाटकांमध्ये काम करत असे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील भूमिकेमुळे तिच्या संपूर्ण करियरला कलाटणी मिळाली असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. 
Anita Date Birthday Special: Mazya Navryachi Bayko fame Radhika Aka Anita Date Kelkar And Chinmay Kelkar Love Story | Anita Date Birthday Special: लग्नाच्या आधी पार्टनरसोबत लिव्ह इन मध्ये राहायची माझ्या नवऱ्याची बायको फेम अनिता दाते

Post a Comment

 
Top