0
  • Amritsar Train Driver Says He Got All Clear Green To Move On, Detained By Copsअमृतसर - रावण दहन पाहण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर थांबलेल्या गर्दीवरून भरधाव एक्सप्रेस निघून गेली. या दुर्घटनेत किमान 60 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या प्रकरणी संबंधित ड्रायव्हरला पंजाब पोलिस आणि रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच त्याची कसून चौकशी केली जात आहे. सुत्रांच्या माहितीनुसार या चौकशीमध्ये ड्रायव्हरने सांगितल्याप्रमाणे, त्याला पूर्णपणे हिरवा सिग्नल मिळाला होता. त्यानंरच ट्रेन पुढे नेली. समोर रावण दहन पाहण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर लोक थांबलेले असतील याची त्याला कल्पना देखील नव्हती. लुधियाणा रेल्वे स्टेशनवर त्याची चौकशी करण्यात आली.


    धिकारी म्हणतात, फाटकावर थांबलेल्या कर्मचाऱ्याचा दोष
    पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, जोरा रेल्वे फाटकाजवळ रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या लोकांपर्यंत पोलिस पोहोचू शकलेले नाहीत. सोबतच काही रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, यात अमृतसरच्या जोरा रेल्वे फाटकावर तैनात असलेल्या लाइनमनचा दोष असू शकतो. शेकडो नागरिक रुळावर थांबले होते. तरीही त्याने यासंदर्भातील माहिती ड्रायव्हर किंवा आपल्या कार्यालयात दिली नाही. रावणाच्या पुतळ्याला आग लागली होती तसेच आतषबाजी सुद्धा सुरू झाली होती. याच फटाक्यांच्या आवाज ट्रेनचा आवाज दबला आणि रुळावर थांबलेल्या
    लोकांना काही कळालेच नाही.

    रेल्वे विभाग म्हणतो आयोजनाची कल्पनाच नव्हती...
    या अपघातात किमान 60 जणांचा मृत्यू झाला. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा शुक्रवारी रात्रीच घटनास्थळाचा दौरा करून पीडितांची विचारपूस केली. येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी घटनेची सविस्तर चौकशी केली जात आहे असे म्हटले आहे. तर दुसरीकडे, पंजाब आणि दिल्लीतील रेल्वे विभागांनी या घटनेवरून हात झटकले आहेत. रेल्वे ट्रॅकजवळ रावण दहनाचा कार्यक्रम होत असल्याची आपल्याला कल्पनाही नव्हती असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी नागरिकांना रेल्वे ट्रॅकवरून दूर करण्याचे काम केले नाही असेही रेल्वे अधिकारी सांगत ...............

Post a Comment

 
Top