0
  • रायपूर - छत्तिसगडच्या राजधानीजवळ रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. हे सगळेच राजनांदगाव परिसरातील मंदिराचे दर्शन घेऊन बोलेरो एसयूव्हीने घरी येत होते. त्याचवेळी त्यांचे वाहन समोरून येणाऱ्या ट्रकला धडकले. रायपूरपासून 70 किमी अंतरावर हा अपघात घडला. यामध्ये आणखी 3 जण जखमी असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
    ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात
    पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बोलेरोच्या ड्रायव्हरने आपल्यासमोर असलेल्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला होता. भरधाव वेगात त्याने समोरील वाहन मागे टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न केला, त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला एसयूव्ही धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच 3 जण जखमी झाले. दम्यान, ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. परंतु, त्याने आपले अपघातग्रस्त ट्रक हायवेवरच सोडले आहे. या घटनेनंतर चार पद्री हायवेची एक लाइन काही काळ खोळंबली 
    9 Members Of Family Dead After Car Rams Truck In Chhattisgarh

Post a Comment

 
Top