इंटरनॅशनल डेस्क - रशियात 900 हून जास्त महिलांवर बलात्कार आणि 5 शाळकरी मुलींना आपल्या वासनेची शिकार बनवणाऱ्या या नराधमाला रशियाच्या न्यायालयाने 22 वर्षे 6 महिन्यांची सश्रम तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.
असे आहे प्रकरण
धक्कादायक बाब म्हणजे सोन्याचे दात बसवलेला 37 वर्षीय व्हिक्टर लिशाव्हस्कीने त्या मुलींनाही सोडले नाही, ज्यांचे त्याच्याकडे कायदेशीर पालकत्व होते. लिशाव्हस्कीने या मुलींना आपल्या सेक्स स्लेव्ह म्हणून वापरल्याचा आरोप आहे.
रशियाच्या इतिहासातील सर्वात क्रूर गुन्हेगार
रिपोर्टनुसार, आरोपी व्हिक्टरने कोर्टासमोर आपले सर्व गुन्हे कबूल केले आहेत. याप्रकरणी चर्चच्या एका माजी प्रमुख पादरीचे म्हणणे आहे की, त्यांनी लैंगिक शोषणाचे एवढे भयंकर प्रकरण रशियाच्या इतिहासात कधीही पाहिलेले नाही.
किशोरवयीन मुलींना बनवायचा वासनेची शिकार
रशियाच्या कोमसोमोल्स ऑन अमूरच्या एका कोर्टासमोर आरोपी व्हिक्टरने 900 हून अधिक बलात्कार, लैंगिक अत्याचाराचे गुन्हे कबूल केले आहेत. आरोपी म्हणाला की, त्याने ज्या महिलांना आपल्या वासनेची शिकार बनवले, त्यातील बहुतांश जणींचे वय 13 वर्षांच्या आसपास होते. कोर्टाने व्हिक्टरला दोषी ठरवत रशियन कायद्यानुसार कठोर शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने पुढे असेही म्हटले की, शिक्षा संपल्यानंतरही व्हिक्टरला 2 वर्षांपर्यंत शहर सोडून जाता येणार नाही. शिवाय त्याला नियमितपणे पोलिसांत हजेरीही द्यावी लागेल. याशिवाय शिक्षा संपल्याच्या 20 वर्षांपर्यंत त्याला लहान मुलांसोबत कोणतेही काम करता येणार नाही.
असा सापडला पोलिसांच्या तावडीत
एक किशोरवयीन मुलगी त्याच्या तावडीतून निसटून पळाली आणि सगळी कहाणी आपली आई ओल्गाला तिने सांगितली. तेव्हा व्हिक्टर लॅशव्हस्कीला महिलांवरील अत्याचारांच्या 5 वर्षांनंतर पकडण्यात आले.
एक किशोरवयीन मुलगी त्याच्या तावडीतून निसटून पळाली आणि सगळी कहाणी आपली आई ओल्गाला तिने सांगितली. तेव्हा व्हिक्टर लॅशव्हस्कीला महिलांवरील अत्याचारांच्या 5 वर्षांनंतर पकडण्यात आले.
ओल्गा तोपर्यंत व्हिक्टरच्या कुकृत्यांपासून अनभिज्ञ होती. त्या मुलीशिवाय आणखी एकीनेही असेच गंभीर आरोप व्हिक्टरवर केले.
आता तुरुंगात रवानगी
रिपोर्टनुसार, आरोपी दिवसा बुटांची दुकान चालवायचा, तर रात्री किशोरवयीन मुलींना आपल्या वासनेची शिकार बनवायचा. दोषीविरुद्ध निकाल देताना कोर्टाने म्हटले की, "लॅशव्हस्की अल्पवयीन मुलींवर बलात्कारप्रकरणी दोषी सिद्ध झाला आहे. काही अल्पवयीनांवर त्याने अत्यंत क्रौर्य केले आहे." याशिवाय कोर्टाने त्याला 16 पेक्षा कमी वयाच्या मुलींवर अश्लील कृत्य केल्याप्रकरणी दोषी मानले आहे.
Post a Comment