0
 • 42 cases of attack on UP-Bihar's people in 5 days in gujarat after girl child abuse incidentअहमदाबाद- साबरकांठा जिल्ह्यात १४ महिन्यांच्या मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर गुजरातमध्ये यूपी-बिहारी लाेकांवर हल्ल्याच्या घटना वाढल्या अाहेत. गेल्या पाच दिवसांत ४२ परप्रांतीयांवर हल्ले झाले. त्यामुळे तब्बल अाठ हजार लाेकांनी जीव मुठीत धरून या राज्याबाहेर पलायन केले. परप्रांतीयांवर संतापाचे पडसाद मेहसाना, साबरकांठा, अहमदाबाद (ग्रामीण), अहमदाबाद (शहर), अरावली, पाटण, गांधीनगर या भागात माेठ्या प्रमाणावर उमटले. हल्ले करणाऱ्या ३४२ लाेकांना पाेलिसांनी अटक केली अाहे.
  Advertisement


  साेशल मीडियावर अफवा पसरवून हिंसाचार घडवल्याप्रकरणी ७० लाेकांवर गुन्हे दाखल करून सात जणांना अटक करण्यात अाली. हल्ले घडणाऱ्या जिल्ह्यांमध्ये परप्रांतीयांच्या सुरक्षेसाठी पाेलिसांनी हेल्पलाइन नंबर जारी केले असून एसअापीच्या १७ कंपन्याही तैनात करण्यात अाल्या अाहेत. यूपी-बिहारी लाेक राहत असलेल्या वस्त्यांमध्ये व काम करत असलेल्या कंपन्यांमध्ये पाेलिसांनी सुरक्षा वाढवली अाहे. गुजरातचे गृह राज्यमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांनी रविवारी सायंकाळी बैठक घेऊन परिस्थितीचा अाढावा घेतला. हल्लेखाेरांना सहजपणे जामीन मिळणार नसल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात अाले. साबरकांठाजवळील हिंमतनगरमध्ये २८ सप्टेंबर राेजी १४ महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाले हाेते. या प्रकरणात अाराेपी असलेल्या एका बिहारी युवकाला पाेलिसांनी अटक केली हाेती. या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांना राज्याबाहेर काढण्यासाठी गुजरातेत अांदाेलने सुरू झाली अाहेत.

  डीजीपी म्हणाले- सणासाठी जात अाहेत गैरगुजराती 
  यूपी-बिहारींना घरे साेडण्याच्या धमक्या देणारे अनेक व्हिडिअाे साेशल मीडियावर व्हायरल झाले अाहेत. एका व्हिडिअाेत काँग्रेसचा तालुकास्तरीय नेता धमकी देताना दिसत अाहे. दरम्यान, डीजीपी शिवानंद म्हणाले, यूपी-बिहारमधील लाेक सणासाठी अापापल्या गावी जात अाहेत, त्याला पलायन म्हणणे याेग्य नाही. रेल्वेस्थानक, बसस्थानकात जाऊन परप्रांतीय लाेकांची समजूत काढण्याच्या सूचना पाेलिसांना देण्यात अाल्या अाहेत. गांधीनगरात गैरगुजराती लाेकांसाठी शिबिरे लावण्यास सांगितले अाहे. अहमदाबादेत परप्रांतीय लाेक राहत असलेल्या भागात पाेलिसांनी पथसंचलन केले.

  वडाेदरात दाेन कंपन्यांवर हल्ले; १० कामगार जखमी
  शनिवारी रात्री वडाेदरा हायवेजवळील जराेद गावात एका कंपनीवर जमावाने हल्ला केला. यात १० कामगार जखमी झाले. धारदार शस्त्र व काठ्या-लाठ्या घेऊन कंपन्यांत घुसलेल्या लाेकांनी परप्रांतीयांवर हल्ला करून रविवारी सकाळपर्यंत हा इलाका साेडण्याची धमकी दिली. काॅंग्रेस अामदार अल्पेश ठाकाेर यांनी भाजप सरकार अापली संघटना गुजरात क्षत्रिय ठाकाेर सेनेच्या कार्यकर्त्यांवर जाणीवपूर्वक कारवाई करत असल्याचा अाराेप केला. जर अापल्या समर्थकांवरील गुन्हा सरकारने मागे घेतले नाही तर साेमवारपासून ७२ तासांचा सद‌्भावना उपवास करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. काही दिवसांपूर्वीच ठाकाेर यांनी अत्याचार पीडित मुलीला न्याय मिळण्याची मागणी................

Post a comment

 
Top