0
  • जयपूर - राजस्थानात एका पागल व्यक्तीने 8 वर्षांच्या मुलाची किचनमधी ल चाकूने गळा कापून हत्या केली. आरोपी मानसिक रुग्ण असल्याचे सांगितले जात आहे. तो रेवाडी(हरियाणा) मधून उपचारासाठी जयपूरला आला होता. यादरम्यान तो एका घरात घुसला आणि मुलाच्या मामीला विचारू लागला, माझ्या आत भूत आहे, कोण काढणार? घाबरून महिलेने स्वतःला खोलीत कोंडून घेतले. यादरम्यान आरोपीने किचनमधून चाकू घेतला आणि मुलाला बाथरूममध्ये ओढत नेले. त्यानंतर त्याठिकाणी मुलाचा गळा कापला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.


    ही घटना पोलिस ठाण्यापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर घडली. येथील आर्य समाज मंदिराखाली श्रवण त्याच्या कुटुंबासह राहत होते. तीन दिवसांपूर्वी त्यांचा भाचा आदित्य(8) आला होता. शुक्रवारी दुपारी सुमारे एकच्या सुमारास तो छतावर खेळत होता. त्याचवेळी अॅश्ले लॉरेन्स(28) त्यांच्या घरात बळजबरी घुसला. त्यावेळी खाली आदित्यची मामी सरिता होती. आरोपीन घरात शिरताच विचारले, माझ्या अंगात भूत आहे, ते बाहेर कोण काढेल? हे ऐकूण सरिताने घाबरत उत्तर दिले, हे आम्ही करत नाही, मंदिरात जा.. हे ऐकूण आरोपी म्हणाला की तो प्रचंड रागात आहे. ते ऐकूण सरिताने लहान मुलीला आणि स्वतःला खोलीत कोंडून घेतले. त्यानंतर आरोपीने हत्याकांड घडवले. घटनेनंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण लोकांनी त्यांना पकडले. पोलिसांनी आरोपीकडून पासपोर्ट जप्त केला आहे. त्याने अनेक देशांत प्रवास केलेला आहे.

Post a Comment

 
Top