0

अमेरिकी डॉलरच्या मुकाबल्यात रुपया 73.70 च्या घरात पोहोचला आहे.

 • मुंबई- गुरुवारी दिवसाच्या सुरुवातीलाच मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सेंसेक्स 850 अंकांनी घसरला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 3 लाख कोटी नुकसान झाले. वाहन, माहिती तंत्रज्ञान, बँक, ग्राहकोपयोगी वस्तू ऊर्जा निर्देशांकांना विक्रीचा फटका बसला आहे.

  आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय रुपयाची घसरण सुरूच आहे. अमेरिकी डॉलरच्या मुकाबल्यात रुपया 73.70 च्या घरात पोहोचला आहे. भारतीय भांडवल बाजारात गुंतवणूकदारांनी विक्रीचा धडाका लावला व शेअर बाजार कोसळला. डॉलरच्या तुलनेत रुपया ४३ पैसे घसरून नव्या नीचांकावर आला. यात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीकडे कल वाढला आणि सोने ३२ हजार पार गेले. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात रेपो दर वाढण्याची शक्यता पाहता कर्ज महाग होऊ शकते. एकंदरीत ऐन सणासुदीत अर्थचक्राला घरघर लागल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडण्याची चिन्हे आहेत.
  आपल्या खिशाला अशी बसणार झळ
  - कच्चे तेल भडकल्याने पेट्रोल, डिझेलचे दर वाढण्याची शक्यता
  - इंधन महागल्याने वाहतूक खर्च वाढून भाजीपाला, फळे, धान्य महागेल.
  - कच्चा मालाच्या किमती वाढल्याने घरे, वाहने महागतील
  - आयात महागल्याने खाद्यतेल, दैनंदिन वस्तू, डाळी महागतील.
  - रुपयाच्या अवमूल्यनाने शैक्षणिक कर्ज महागणार, विदेशातील विद्यार्थ्यांना फटका
  कर्ज महाग, टांगती तलवार
  रिझर्व्ह बँकेची पतधोरण आढावा बैठक सुरू आहे. सद्य:स्थितीत रेपो दरात 0.25 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृह, वाहनसह सर्व कर्ज महागण्याची शक्यता आहे.
Yo

Post a comment

 
Top